राष्ट्रवादीत फुट नसून पक्षावर ताबा मिळविण्याचा कट !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २५ नोव्हेबर २०२३

राष्ट्रवादी पक्ष व पक्षचिन्हावरील दाव्यासंदर्भात शुक्रवारी निवडणूक आयोगापुढे पार पडलेल्या सुनावणीवेळी शरद पवार गटाने ही पक्षांतर्गत फूट नसून अजित पवार गटाचा पक्षावर ताबा मिळवण्यासाठीचा कट असल्याचा आरोप केला. तसेच पक्ष विस्तारात अजित पवारांचा कुठलाही सहभाग नसून शरद पवार हेच राष्ट्रवादी काँग्रेसचे निर्विवाद अध्यक्ष असल्याचा दावा या गटाने केला. तर सुनावणीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांनी शरद पवार गटाच्या युक्तिवादात तेच ते मुद्दे असल्याचे सांगितले. तसेच गुरुवारी होणाऱ्या सुनावणीत आम्ही आमची बाजू मांडताना सविस्तर प्रत्युत्तर देऊ, असे तटकरे म्हणाले.

शरद पवार गटाचे वकील देवदत्त कामत यांनी आयोगापुढील सुनावणीत अजित पवारांच्या अध्यक्षपदाच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अजित पवार यांची पक्ष विस्तारात कोणतीही भूमिका नाही. त्यांना फक्त पक्षावर ताबा हवा आहे, म्हणून त्यांनी प्रफुल्ल पटेल यांच्याशी संपर्क साधला. हेच पटेल दिल्लीतील पक्षाच्या अधिवेशनात शरद पवारांच्या अध्यक्षपदी निवडीवेळी प्रस्तावक होते. पक्षाच्या राज्यघटनेनुसार ही निवडणूक प्रक्रिया पार पडली आणि शरद पवार यांची एकमताने अध्यक्षपदी निवड करण्यात आली. स्वतः अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषदेत याबाबत सांगितले होते. मात्र ३० जून रोजी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली एका गटाने भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी अपात्रतेची कारवाई टाळण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्याचा प्रचार या गटाकडून करण्यात आला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम