उत्तर महाराष्ट्रात दोन दिवस पावसाची जोरदार शक्यता !
बातमीदार | २५ नोव्हेबर २०२३
नाशिकसह नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, ठाणे, पालघर आणि मराठवाडा विभागात दोन दिवस पावसाची शक्यता असून, काही भागात मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.
पुढील दोन महिने अल निनोचे १.६ इतके टेम्परेचर असून, प्रभाव कायम राहील. जानेवारी, फेब्रुवारीनंतर हळूहळू तीव्रता कमी होत जाईल. मे, जून, जून, जुलै २०२४ मध्ये ३० टक्के अल निनोची, ३० टक्के ला निनोची आणि ६० टक्के न्यूट्रल परिस्थिती राहणार असून, आयओडीची परिस्थिती पुढील १५ दिवस कायम राहणार आहे. मात्र, डिसेंबरमध्ये आयओडी न्यूट्रल परिस्थितीत येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
उत्तर महाराष्ट्रात अशी राहील स्थिती नाशिकच्या पश्चिम भागातील पेठ, त्र्यंबकेश्वर परिसरात ५० ते ६० मिलीमीटरपर्यंत पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला असून, पूर्व भागातील तालुक्यांत २५ मिलीमीटर पासून काही भागात ४० ते ४५ मिलीमीटरपर्यंत पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. नंदुरबारच्या काही तालुक्यांत ५० मिलीमीटरहून अधिक पावसाचा अंदाज असून, काही भागात ३० ते ३५ मिलीमीटर पाऊस होण्याची शक्यता आहे. धुळे पश्चिम भागात ५० ते ५५ मिलीमीटरपर्यंत पाऊस होईल. इतर ठिकाणी २५/३०/३५ मिलीमीटरपर्यंत पाऊस होऊ शकतो. जळगावच्या अनेक भागांत ४० मिलीमीटरपर्यंत पाऊस होण्याची शक्यता असून, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर उत्तर भागातही जोरादार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता जायभावे यांनी व्यक्त केली आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम