‘पाकिस्तान जिंदाबाद’ म्हणणारे देशद्रोही नाही? नवा वाद उफाळण्याची शक्यता
दै. बातमीदार । २६ नोव्हेंबर २०२२ । मागील आठवड्यात राज्यासह देशभरातील विविध भागांत राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) ने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या वादग्रस्त संघटनेच्या कार्यालयांवर छापेमारी केली होती. सदर कारवाईच्या निषेधार्थ संघटनेच्या समर्थकांनी पुणे येथे निदर्शने करीत ‘पाकिस्तान जिंदाबाद’ च्या घोषणा दिल्या. याप्रकरणी पुणे पोलिसांनी घेतलेल्या भूमिकेमुळे एक नवा वाद निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.
दहशतवादासाठी अर्थसहाय्य करण्याचा आरोप असलेल्या पीएफआय संघटनेवर झालेल्या छापेमारीमुळे संघटनेच्या समर्थकांनी पुण्यात ‘पाकिस्तान जिंदाबाद’ च्या घोषणा देत निदर्शने केली. याप्रकरणी मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी घोषणाबाजी करणाऱ्या दोषींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. मात्र, पुणे पोलिसांनी घोषणाबाजी करणाऱ्यांविरोधातील देशद्रोहाचे कलम मागे घेतले.
या भूमिकेबाबत स्पष्टीकरण देताना पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयातील एका जुन्या निकालाचा निर्वाळा देत, ह्या निकालानुसार घोषणा देणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करता येणार नाही, असे म्हटले आहे.
दरम्यान, विविध राजकीय पक्ष व मान्यवर पीएफआय विरुद्ध संताप व्यक्त करत असून, या प्रकारामुळे अजून एक नवा वाद उफाळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम