एक नव्हे तर दोन चक्रीवादळं धडकणार : काही राज्यात अलर्ट जारी !
बातमीदार | १५ नोव्हेबर २०२३
देशभरातील बदलत्या हवामानामुळे अनेक राज्यात देखील पावसाचे वातावरण निर्माण झाले आहे. तर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यानंतर ओडिशाच्या किनारपट्टी भागात वाऱ्याचा वेग 45 किमी ते 65 किमी प्रतितास वेगाने वाहण्याचा अंदाज IMD ने वर्तवला आहे. एक नाही तर चक्क भारताच्या किनारपट्टीवर दोन चक्रीवादळं घोंगावत असल्याने हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रावर होणार का? कोणत्या राज्यांमध्ये पाऊस पडणार समजून घेऊया.
ANI ने दिलेल्या वृत्तानुसार हवामान खात्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झालं आहे, जे नंतर पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरात मोठ्या चक्रीवादळात बदलू शकतं. 15 नोव्हेंबरपासून आंध्र प्रदेश किनारपट्टीवर आणि आसपास वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता आहे. १५ आणि १६ नोव्हेंबर महत्त्वाचे दिवस असणार आहेत.
मोचा आणि बिपरजॉय तेज चक्रीवादळ येऊन गेली. आता हामून आणि त्यापाठोपाठ आता मिधिली चक्रीवादळाचा धोका आहे. आयएमडीचे शास्त्रज्ञ उमाशंकर दाश यांनी मंगळवारी सांगितले की, बंगालचा उपसागर आणि लगतच्या अंदमान आणि निकोबार बेटांवरील कमी दाबाचे क्षेत्र 16 नोव्हेंबरला आंध्र प्रदेश किनार्याजवळ पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र बनून उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे.
17 नोव्हेंबर रोजी ओडिशा किनारपट्टीपासून वायव्य बंगालच्या उपसागरात पोहोचेल. महाराष्ट्रातील काही ठिकाणी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पुढील 4 दिवस पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने वर्तवला अंदाज व्यक्त केला आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने सध्या देशात अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. मुंबई, ठाणेसह पालघर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. गेले काही दिवस या भागात ढगाळ वातावरणासह पावसाची हजेरी पाहायला मिळाली. भारतीय हवामानशास्त्र विभागनुसार, दक्षिणपूर्व बंगाल उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम