पवारांनी नव्हे तर तुम्हीच फोडले शिवसेना ; राष्ट्रवादीच्या नेत्याचा दावा !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ८ एप्रिल २०२३ ।  राज्यातील राजकारण आता वेगळ्या वळणावर जात असतांना दिसत आहे. नुकतेच भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांवर टीका करताना वक्तव्य केले होते की, ‘त्या’ एका माणसामुळे दोन भावांमध्ये भांडण सुरु असून शिवसेनेच्या फुटीसाठीसुद्धा ते कारणीभूत आहेत. त्याला छगन भुजबळांनी प्रत्युत्तर दिले. ते नाशिक येथे पत्रकारांशी बोलत होते.

तुम्हीच शिवसेना फोडली. तुम्हीच शिवसेनेमध्ये भांडणे लावली. अशी कामे शरद पवार करत नाहीत, असेस प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांना दिले आहे. छगन भुजबळ म्हणाले की, ‘शिवसेनेत जी फूट पडली, त्यामागे कुणाचा हात आहे, हे अवघ्या महाराष्ट्राला माहित आहे. दोन भावांमध्ये आम्ही नाही तर तुम्ही भांडणे लावली. हेदेखील सर्व महाराष्ट्राला माहीत आहे. शरद पवार असे काम कधीही करत नाहीत.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अदानी घोटाळ्याच्या चौकशीसाठी जेपीजीऐवजी सुप्रीम कोर्टाची समिती अधिक योग्य ठरेल, असे म्हटले आहे. तसेच, अदानींना लक्ष्य केल्याचे वाटते, अशी प्रतिक्रियाही त्यांनी एका वृत्तवाहिनीवरील मुलाखतीत दिली. त्यावर भाष्य करताना छगन भुजबळ म्हणाले की, आपल्या देशातील उद्योगपतींचे खच्चीकरण करु नये. त्यांची आपली बदनामी होता कामा नये. अशीच भूमिका शरद पवारांनी मांडली आहे. पूर्वी आम्हीही टाटा, बिर्ला यांच्यावर टीका करायचो. मात्र, आता लक्षात येते की, त्यांनी आरोग्य, शिक्षण या क्षेत्रातही हजारो कोट्यवधी रुपयांचे काम केले. त्यामुळे उद्योपतींचे खच्चीकरण होता कामा नये, अशीच भूमिका शरद पवारांनी मांडली.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम