आता देशावर राज्य करेल ‘आप’ -केजरीवाल

बातमी शेअर करा...

बातमीदार | १८ नोव्हेबर २०२३

आम आदमी पक्ष अवघ्या १० वर्षांत राष्ट्रीय पक्ष ठरला असून सध्या भाजप व काँग्रेस यांच्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर असलेला ‘आप’ एक दिवस या दोन्ही पक्षांना मागे टाकून देशावर राज्य करेल, असा दावा दिल्लीचे मुख्यमंत्री व आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी केला. शुक्रवारी आप कार्यकर्त्यांच्या संमेलनाला संबोधित करताना ते बोलत होते.

स्थापनेपासून आतापर्यंत आप वर्षागणिक प्रबळ होत गेला. गत दहा वर्षांत आप राष्ट्रीय पक्ष झाला देशातील १३५० नोंदणीकृत पक्षांना मागे टाकून आप तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष झाला आहे. सध्या फक्त भाजप आणि काँग्रेसच आपच्या पुढे आहेत. आपल्या पक्षाच्या प्रगतीचा चढता आलेख पाहता आप लवकरच भाजप आणि काँग्रेसला मागे टाकून देशावर राज्य करेल, असे केजरीवाल म्हणाले. भाजप मला अटक करण्याचा कट रचत असल्याचा आरोप करत केजरीवालांनी कार्यकर्त्यांना या कटाबद्दल जनतेला माहिती देण्याचे आवाहन केले. मला मुख्यमंत्री पदाचा मोह नाही. अवघ्या ४९ दिवसांत मुख्यमंत्री पदाचा त्याग करणारा मी जगातील पहिला व्यक्ती असेल. परंतु तुरुंगात गेलो.

तरी मीच मुख्यमंत्री राहावे, असे आपल्या आमदार, नगरसेवकांचे म्हणणे आहे. आता तुम्ही लोकांपर्यंत जा आणि त्यांना मी मुख्यमंत्रीपदी कायम राहावे का, हे विचारा. माझ्या अटकेचा भाजपने कट रचला असल्याची माहितीही जतनेला द्या, असे केजरीवाल म्हणाले. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत दिल्लीतून भाजप एकही जागा जिंकणार नाही, हे सुनिश्चित करण्याचे आवाहन केजरीवालांनी केले. आपचे चार नेते तुरुंगात आहेत. ते आपले आदर्श आहेत. भाजपपुढे झुकण्याऐवजी त्यांनी तुरुंगात जाणे पत्कारले. आज त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर २४ तासांत ते तुरुंगातून बाहेर येतील. निवडणुकीत विरोधकांची प्रचार यंत्रणा डळमळीत करण्यासाठी त्यांचे प्रमुख नेते तुरुंगात टाकायचे हा भाजपचा कट आहे. बिहार, पश्चिम बंगाल, झारखंडमध्येही त्यांनी हेच केले, असा आरोप केजरीवालांनी केला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम