ललित पाटील प्रकरणी दोन पोलिसांना अटक !

बातमी शेअर करा...

बातमीदार | १८ नोव्हेबर २०२३

राज्यातील पुणे येथील ड्रग्ज तस्कर ललित पाटील याच्या ससूनमधील लायनप्रकरणी पुण्यात न्यायालयीन ड्युटीवर असलेल्या दोन पोलिसांना शुक्रवारी अटक करण्यात आली. या प्रकरणात यापूर्वी तीन पोलीस अधिकाऱ्यांसह १० पोलिसांना निलंबित केले आहे. पाटील याने २ ऑक्टोबर रोजी ससून रुग्णालयातून पलायन केले होते. त्यावेळी त्याच्या हॉटेलमध्ये त्याच्यासोबत एक पोलीस असल्याचे सीसीटीव्ही चित्रीकरणामध्ये निदर्शनास आले होते. त्याबाबत त्याचा व अन्य एका पोलिसाचा गुन्ह्यात थेट सहभाग असल्याची माहिती तपासात निष्पन्न झाली. त्यामुळे पोलीस नाईक नाथाराम काळे आणि अमित जाधव या दोघांना बेड्या ठोकण्यात आल्या. त्यांना पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी तपासासाठी या दोघांना पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला.

अमली पदार्थ विक्री प्रकरणात अटक केलेल्या आरोपींना नाशिकप्रमाणे पुण्यातही अमली पदार्थ निर्मितीचा कारखाना सुरू करायचा होता. मात्र त्यांचे रॅकेट उघडकीस आल्याने त्यांचा डाव फसल्याची माहिती – तपासात निष्पन्न झाली. या गुन्ह्यातील आरोपी इम्रान शेख ऊर्फ अतिक अमीर खान याला मुंबईतील कुर्ल्यामधून व हरिश्चंद्र पंत याला बोईसरमधून बुधवारी शहर गुन्हे अन्वेषण विभागाच्या (युनिट – २) पोलिसांनी अटक केली. या दोघांसह या गुन्ह्यात अटक केलेल्या व सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपींना प्रॉडक्शन वॉरंटद्वारे ‘मोक्का’नुसार पुन्हा ताब्यात घेण्यात आले. सुभाष जानकी मंडल, रौफ रहीम शेख, भूषण पाटील, अभिषेक बलकवडे, अरविंदकुमार लोहारे आणि प्रज्ञा कांबळे यांना पोलिसांनी येरवडा कारागृहातून, तसेच रेहान ऊर्फ गोलू , याला तळोजा कारागृह व झिशान इक्बाल शेख याला आर्थर रोड कारागृहातून प्रॉडक्शन वॉरंटद्वारे ताब्यात घेतले आहे. पंत याचा नाशिकमधील एमआयडीसीमध्ये सुरू असलेल्या मेफेड्रॉन निर्मिती कारखान्यामध्ये प्रशिक्षण, उत्पादन आणि विक्रीमध्ये सक्रिय सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम