…आता कॉंग्रेसचे आमदार ही फुटणार ; शिंदे गटाच्या मंत्र्यांचा दावा !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ८ जुलै २०२३ ।  राज्यात अजित पवारांनी राष्ट्रवादीत उभी फुट पाडली असून त्या घटनेला अजून सात दिवस झाले असतांना यामध्ये आता शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांनी गौप्यस्फोट केला आहे. काँग्रेसचे आमदारही फुटणार आहेत असं आता गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे. शरद पवार विरुद्ध अजित पवार असं चित्र राज्यात निर्माण झालं आहे. अशात शरद पवार यांनी महाराष्ट्र दौरा सुरु केला आहे. अजित पवार यांनीही उत्तरसभा घेणार असल्याचं जाहीर केलं आहे. अशात आता गुलाबराव पाटील यांनी काँग्रेस फुटणार असल्याचंही म्हटलं आहे.

“नीलम गोऱ्हेही आमच्याकडे आल्या. त्यांना प्रवेश करण्याची खरंतर गरज नव्हती. पण दाल में कुछ काला है त्यामुळेच त्या आमच्या बरोबर आल्या. त्यामुळेच लोक पक्षांतर करत आहेत. जे काही सुरु आहे ते तुम्ही बघत आहात. उद्या काय होईल ते काही सांगता येत नाही. मी तर ऐकलं आहे की काँग्रेसचे आमदारही तयारीत आहेत. सांगता येत नाही. ते कुणाकडे येतील ते माहित नाही. पण ते येतील अशी चर्चा आहे.” असं म्हणत गुलाबराव पाटील यांनी गौप्यस्फोट केला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम