राष्ट्रवादीच्या बंडखोरांना पवारांनी ठणकावले ; पराभूत होणारच !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ८ जुलै २०२३ ।  राज्यात अजित पवारांनी राष्ट्रवादी फोडल्यानंतर शरद पवारांनी थेट जनतेचे मत जाणून घेण्यासाठी राज्याच्या दौऱ्यावर निघाले असतांना सुरुवात आता छगन भुजबळ यांच्या मतदार संघातून केली असून आज शरद पवार येवल्यात आले आहे.

शरद पवार म्हणाले कि, भुजबळांना सेफ जागा द्यायची होती, त्यामुळे मीच येवला मतदार संघाचे नाव सूचवले असल्याची माहिती देखील त्यांनी दिली. वस्तुस्थिती मांडण्यासाठी महाराष्ट्राचा दौरा करण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. नाशिक जिल्ह्यातून या दौऱ्याला सुरूवात करताना, त्यांनी नाशिकचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखीत केले.

छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला असलेल्या नाशिकच्या येवला मतदारसंघात शरद पवार यांची आज पहिली जाहीर सभा होणार आहे. आज सायंकाळी 4 वाजता येवला येथे ही सभा होणार आहे. या सभेच्या माध्यमातून शरद पवार राज्यव्यापी दौऱ्याचा पहिला नारळ येवला येथे फोडणार आहेत. तसेच संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. वयाच्या 83व्या वर्षीही शरद पवार मैदानात उतरले आहेत. पक्षातील फुटीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार काय बोलणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. आज येवला बाजार समितीच्या मैदानावर पवारांची सभा होणार आहे. स्थानिक नेते माणिकराव शिंदे व अन्य पदाधिकाऱ्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. केंद्रीय कृषिमंत्री असताना पवारांनी जिल्ह्यातील अनेक तालुक्यांना विविध योजनांच्या माध्यमातून दिलेल्या लहान-मोठ्या प्रकल्पांची परतफेड म्हणून सभेला जास्तीत जास्त लोकांनी यावे अशी साद घातली जात आहे.

पवारांची सभा सुरू होईल त्याच वेळी इकडे भुजबळ यांच्या रॅलीला सुरुवात होणार आहे, जेणेकरून टीव्ही चॅनलमध्ये शेजारी-शेजारी दोन्ही घडामोडी लोकांना दिसतील व त्यातून संभाव्य डॅमेज कंट्रोल करता येईल अशी रणनीती भुजबळ कॅम्पने आखली आहे. दुपारी दोन वाजता भुजबळ इगतपुरीत येणार असून मुंबई-आग्रा महामार्गावर त्यांचे जोरदार स्वागत केले जाणार आहे. त्यानंतर पाथर्डी फाटा येथे त्यांचा भव्य सत्कार करून राष्ट्रवादी भवन येथे ते दाखल होणार आहेत. हा सर्व मार्ग साधारण पंचवीस किलोमीटरचा असून येथून जाणाऱ्या रॅलीचे लाइव्ह प्रक्षेपण होणार असल्यामुळे शरद पवारांना मिळणारी संभाव्य मीडिया स्क्रीन निम्मी-निम्मी करण्याचा प्रयत्न आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम