आताची मोठी बातमी : शिंदे गटाकडून चिन्हासाठी पुन्हा तीन पर्याय सादर

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ११ ऑक्टोबर २०२२ । दि १० रोजी निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला धग धगती मशाल दिल्यानंतर आज दि ११ रोजी सकाळी १० पर्यतची मुदत शिंदे गटाला दिली होती, आताच शिंदे गटाने निवडणूक आयोगाला तीन चिन्ह दिल्याची खात्रीलायक माहिती समोर येत आहे. निवडणूक आयोगाने शिंदे गटाची चिन्हे नाकारल्यानंतर शिंदे गटाकडून पुन्हा तीन चिन्हे निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आली आहेत. इमेल करून हे तीन पर्याय सादर करण्यात आली आहेत. तळपता सूर्य, ढाल तलवार आणि पिंपळाचे झाड हे तीन पर्याय शिंदे गटाकडून देण्यात आली आहेत.

दरम्यान, शिंदे गटाकडून रिक्षा हे चिन्ह सादर करण्यात येणार असल्याची चर्चा होती. दुसरे चिन्ह तुतारी फुंकणारा व्यक्ती आणि तिसरे चिन्ह शंख अशी चर्चा सध्या होत होती पण शिंदे गटाकडून तळपता सूर्य, ढाल तलवार आणि पिंपळाचे झाड हे तीन चिन्ह सादर करण्यात आली आहेत. तर उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेने तीन चिन्ह सादर केले होते. त्यामध्ये उगवता सूर्य, मशाल आणि त्रिशूळ असे तीन पर्याय दिले होते. त्यातील मशाल या चिन्हावर निवडणूक आयोगाने शिक्कामोर्तब केलं. त्यानंतर ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव ठाकरे गटाला देण्यात आले आहे. तर शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असं नाव देण्यात आलं आहे.

दरम्यान, निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार शिंदे गटानेही तीन चिन्ह सादर केले होते. त्यामध्ये उगवता सूर्य, त्रिशूळ आणि गदा हे तीन पर्याय दिले होते तर दोन्ही गटाने सादर केलेल्या चिन्हांपैकी दोन चिन्ह सारखे असल्यामुळे ते कुणालाच देण्यात आले नाहीत. गदा हे चिन्ह निवडणूक आयोगाने नाकारत शिंदे गटाला दुसरे पर्याय देण्यास सांगितलं होतं. त्यानंतर आता इमेल करत शिंदे गटाने तीन निवडणूक चिन्हे सादर केली आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम