आता टोल नाक्यावर मनसेचे राहणार कॅमेरे !
बातमीदार | १३ ऑक्टोबर २०२३
राज्यातील मनसे पक्ष गेल्या अनेक वर्षापासून टोल मुक्त महाराष्ट्र व्हावा यासाठी अनेक आंदोलन करीत आहे पण आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांची राज ठाकरे यांच्या शिवतीर्थावर झालेल्या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले आहे.
या बैठकीनंतर राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती दिली. यात मुंबईत प्रवेश करणाऱ्या प्रत्येक टोल नाक्यावर सरकार आणि मनसेचे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार असल्याची माहिती राज ठाकरे यांनी दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील बैठकीला उपस्थित असल्याचे आधी सांगण्यात येत होते. त्यासाठी राज ठाकरे यांच्या निवासाबाहेरील पोलिस सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती. काल राज ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाच्या वतीने देण्यात आली होती. त्यामुळे आजच्या बैठकीत कोणता निर्णय होतो, याकडेही सर्वांचेच लक्ष लागले होते. मात्र, आजच्या बैठकीला मुख्यमंत्री उपस्थित नव्हते. तर मंत्री दादा भुसे आणि राज ठाकरे यांच्यातच ही बैठक झाली.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम