आता सरकारी अधिकाऱ्यांना कार घेण्यासाठी १५ लाखांपर्यंत अॅडव्हान्स

बातमी शेअर करा...

बातमीदार | १८ ऑक्टोबर २०२३

सरकारी राजपत्रित अधिकाऱ्यांना कार घेण्यासाठी अॅडव्हान्स दिला जातो, ही रक्कमा आता १५ लाखांपर्यंत वाढविण्यात आली आहे. नवीन गाडी घेण्यासाठी १५ लाखांपर्यंत, तर जुन्या गाडीसाठी ७.५०- लाखांपर्यंत अॅडव्हान्स दिला जाणार आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांना चारचाकी घेण्यासाठी देण्यात येणारी अॅडव्हान्स रक्कम त्यांना १०० समान हप्त्यांत फेडावी लागणार आहे. याव्यतिरिक्त १० टक्के व्याज आणखी ४० हप्त्यांत वसूल केले जाणार आहे. त्यामुळे साधारण १२ वर्षांत हा गाडीचा हप्ता फेडता येणार आहे. जुन्या गाडीसाठी हा कालावधी सहा वर्षांचा असणार आहे. तोपर्यंत ही गाडी सरकारलेखी गहाण म्हणून नमूद राहणार आहे. अॅडव्हान्स मंजूर झाल्यानंतर १ महिन्याच्या आत गाडी खरेदी करावी लागणार आहे. जर अधिकाऱ्यांकडून हप्ते थकले तर या कारचा लिलाव करण्यात येणार आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम