ड्रग्ज तस्कर ललित पाटीलला बंगळूरूमधून घेतले ताब्यात !

बातमी शेअर करा...

बातमीदार | १८ ऑक्टोबर २०२३

राज्यातील गेल्या काही दिवसापासून पुण्यातील ड्रग्ज प्रकरणी आता मुंबई पोलिसांना तस्कर ललित पाटील याला अखेर अटक करण्यात यश आले आहे. त्याला बंगळूरू येथून ताब्यात घेण्यात आले आहे. पुण्यातील ससून रुग्णालयातून तो फरार झाला होता. त्यामुळे ड्रग्ज माफीया ललित पाटील याचा शोध पोलिस घेत होते. त्याला अटक करण्यासाठी पोलीसांची दहा पथके तयार करण्यात आली होती. अखेर रात्री चेन्नई येथे लपून बसलेल्या पाटील याला अटक करण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे. आरोपी ललित पाटील याला पुण्यात आणले जाणार असून त्यानंतर कोर्टात सादर केले जाणार आहे.

जोगेश्वरी (पूर्व) येथील बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात (ट्रामा केयर सेंटर)मध्ये ललित पाटील याला वैद्यकीय तपासणीसाठी आणण्यात आले. मुंबई पोलिसांचे अनेक वरिष्ठ अधिकारी रुग्णालयाच्या आवारात हजर होते. या रुग्णालयातून त्याला अंधेरी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

साकीनाका पोलिसांच्या ताब्यात असलेल्या एका आरोपीला ललित पाटीलने नव्या नंबरवरून कॉल केला आणि तिथेच तो फसला. त्यानंतर साकीनाका पोलिसांनी प्रचंड गोपनीयता बाळगत तीन पथके ललित पाटीलच्या शोधासाठी तयार केली. दरम्यान ललित पाटील आणि ताब्यात असेलल्या आरोपीचे रोज संभाषण होत असे. त्यावरून पोलिसांना ललित पाटीलच्या हालचालींविषयी माहिती मिळत होती. त्यानुसार सापळा रचून साकीनाका पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम