आता मिळणार ४० रुपयात रूम ; अशी करा बुक !

बातमी शेअर करा...

आपण देशातील अनेक ठिकाणी प्रवास भारतीय रेल्वेच्या माध्यमातून करीत असतो. अनेकदा प्रवाशांची तक्रार असते की ट्रेन खूप उशिरानं धावत आहे. भारतीय रेल्वे तुम्हाला फक्त ट्रेनमध्येच प्रवास करवत नाही, तर रेल्वे स्थानकावर अनेक आलिशान खोल्या आहेत ज्यात तुम्ही आरामही करू शकता.

या ५ स्टार सारख्या खोल्या बुक करण्यासाठी तुम्हाला फक्त ४० रुपये खर्च करावे लागतील. आजही ९९ टक्क्यांना लोकांना याबद्दल कोणतीही माहिती नाही, त्यामुळे बहुतांश लोक रेल्वेच्या या सुविधेचा लाभ घेऊ शकत नाहीत.

कशी कराल रुम बुक?
रेल्वे स्थानकावर रूम बुक करण्यासाठी तुम्हाला आधी कन्फर्म तिकीट लागेल. तुम्ही ज्या ट्रेनमध्ये प्रवास करत आहात त्या ट्रेनच्या कन्फर्म तिकिटाचा PNR नंबर रेल्वे स्टेशनवर रूम बुक करण्यात मदत करेल. या खोल्या बुक करण्यासाठी तुम्ही रेल्वेच्या (https://www.rr.irctctourism.com/#/home) या वेबसाइटला भेट देऊ शकता. या ठिकाणी तुम्ही एसी, नॉन एसी अशा दोन्ही प्रकारच्या रूम बुक करू शकता.

किती येईल खर्च?
रेल्वे स्थानकावर या खोल्यांच्या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला फक्त २० ते ४० रुपये खर्च करावे लागतील. रेल्वेच्या या सुविधेचा लाभ सर्वसामान्य तिकीटधारकही घेऊ शकतात. तथापि, तुमचा प्रवास ५०० किलोमीटरपेक्षा जास्त अंतराचा असणं अनिवार्य आहे. सुविधेचा लाभ प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर निश्चित केला जातो. यासोबतच तुम्ही रेल्वे स्थानकावरील या खोल्यांमध्ये पूर्ण २ दिवस म्हणजे ४८ तास कोणत्याही अडथळ्याशिवाय राहू शकता. तुम्हाला या रिटायरिंग रूम बहुतेक मोठ्या रेल्वे स्थानकांवर मिळतात.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम