राहुल गांधींविरोधात आक्षेपार्ह पोस्टर ; काँग्रेसची न्यायालयात धाव

बातमी शेअर करा...

बातमीदार | ८ ऑक्टोबर २०२३

देशभरात आगामी लोकसभेपूर्वीच भाजप व कॉंग्रेस पक्षात आतापासून राजकीय राडा सुरु झाल्याचे चित्र दिसू लागले आहे. नुकतेच भाजपने काँग्रेस नेते राहुल गांधींना एका पोस्टरमध्ये कथितरीत्या ‘दशानन’ अर्थात रावण स्वरूपात दाखवल्याने राजस्थानच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या कृत्याविरोधात काँग्रेसने न्यायालयात धाव घेतली असून, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष व आयटी विभागाच्या प्रभारीविरोधात जयपूर महानगर न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सोमवारी सुनावणी होणार आहे.

भाजपने गुरुवारी राहुल गांधींना दशानन दाखवत, ते नव्या युगातील रावण असल्याचे स्पष्ट करत एक पोस्टर जारी केले होते. या पोस्टरमुळे आमच्या नेत्याचा अपमान झाल्याचा आरोप करत काँग्रेसचे राजस्थान प्रदेश महासचिव जसवंत गुर्जर यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा व भाजपच्या आयटी विभागाचे प्रभारी अमित मालवीय यांच्या विरोधात जयपूर महानगर न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने ही याचिका स्वीकारली असून ९ ऑक्टोबर रोजी तिच्यावर सुनावणी होणार असल्याचे गुर्जर यांनी स्पष्ट केले. नड्डा व मालवीय या दोन्ही भाजप नेत्यांवर भादंविचे कलम ४९९ ( इतर व्यक्तीवर खोटे आरोप करणे), ५०० ( मानहानी), ५०४ ( मुद्दामहून अवमान करणे ) याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी या याचिकेद्वारे गुर्जर यांनी केली आहे. काँग्रेस व या पक्षाशी संबंधित नेत्यांचा अवमान करुन राजकीय लाभ मिळवण्याच्या उद्देशाने आरोपींनी ५ ऑक्टोबर रोजी मुद्दामहून चुकीचे पोस्टर प्रसिद्ध केल्याचा आरोप या याचिकेत केला आहे

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम