रिक्षा व दुचाकीचा भीषण अपघात : जळगावातील प्रौढाचा मृत्यू !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ८ ऑक्टोबर २०२३

जळगाव – ममुराबाद नजीक असलेल्या एका पेट्रोल पंपाजवळ भरधाव पॅजो रिक्षासह दुचाकीची समोरासमोर धडक होवून झालेल्या अपघातात विजय पंडीत कोळी (वय ४५, रा. पार्वती ओक नगर) या प्रौढाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास ममुराबाद गावाजळील पेट्रोलपंपासमोर घडली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील पार्वतीबाई ओक नगरात विजय कोळी हे कुटुंबियांसह वास्तव्यास होते. शनिवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास विजय कोळी हे (एमएच १९ एवाय ७९०५) क्रमांकाच्या दुचाकीने विदगावहून जळगावकडे जाण्यासाठी निघाले. तर ममुराबाद येथून (एमएच १९ व्ही ३६४२) क्रमांकाची पॅजो रिक्षा मजूरांना घेवून यावलकडे जात होती. ममुराबाद गावाजवळ असलेल्या फार्मसी कॉलेजवळील पेट्रोलपंपासमोर दुचाकी आणि पॅजो रिक्षाची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दुचाकीस्वार विजय कोळी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. घटनेची माहिती मिळतच तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक माणिक सपकाळे व पोहेकॉ विलास शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेत जखमी विजय कोळी यांना नागरिकांच्या मदतीने एका वाहनातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांची तपासणी करीत मयत घोषीत केले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुली, मुलगा, भाऊ, पुतणे असा परिवार आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम