ओला स्कूटरने बाजारात घातला धुमाकूळ !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २२ जुलै २०२३ । देशात गेल्या काही वर्षापासून इलेक्ट्रिक व्हेईकलची क्रेज सुरु असतांना दिसत आहे. सध्या या इलेक्ट्रिक व्हेईकलमध्ये ओलाचे गारुड अजून ही सेगमेंटमध्ये कायम असून बेंगळुरुच्या या कंपनीची OLA S1 Air ही स्कूटर बाजारात येऊ घातली आहे. ही स्कूटर बाजारात धुमाकूळ घालेल असा एक्सपर्टचा दावा आहे. गेल्या वर्षी ओलाच्या इलेक्ट्रिक स्कूटरने प्री-लाँच बुकिंग सुरू केल्याच्या अवघ्या 24 तासांत 1 लाखांचं बुकिंग नोंदवलं होतं. हा कंपनीसाठी हा सुखद धक्का होता. पण नंतर डिलिव्हरीमध्ये होणारा विलंब आणि ब्रँडमधील तांत्रिक चुकांमुळे ओलाच्या वाहनांवर ग्राहकांनी संताप व्यक्त केला होता. काही ठिकाणी या कंपनीच्या स्कूटरला आग लागण्याच्या घटना ही घडल्या होत्या. त्यानंतर कंपनीने अनेक बदल केले. आता OLA S1 Air ही स्कूटर बाजारात या दिवशी धुमाकूळ घालणार आहे.

ओला कंपनीची एस1 एअर इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री करण्यात येणार आहे. 28 जुलै 2023 रोजीपासून ही स्कूटर बाजारात दाखल होत आहे. ग्राहकांना सवलतीत ही स्कूटर खरेदी करता येईल. त्यासाठी 30 जुलै 2023 रोजीपर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे.

असा होईल फायदा

31 जुलै रोजीनंतर ई-स्कूटर खरेदी केल्यास, इलेक्ट्रिक स्कूटरसाठी 1,19,999 रुपये एक्स-शोरूम किंमत चुकती करावी लागेल. ही स्कूटर ओला कम्युनिटीवर अगोदर बुक करता येईल. 28 जुलै पूर्वी स्कूटरची बुकिंग करता येईल. ग्राहकांना त्याचा मोठा फायदा होईल. त्यांना 1,09,999 रुपये एक्स-शोरूम किंमत मिळेल. याविषयीची माहिती ट्विटर हँडलवर कंपनीने दिली आहे.

काय आहेत फीचर

ओला एस1 एअर इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 3 kWh चा बॅटरी पॅक देण्यात आले आहे. ही स्कूटर 125 किमी गतीने धावण्याचा दावा करण्यात आला आहे. याची उच्चांकी गती 90 किमी/तास अशी आहे. यामध्ये एक हब मोटर आहे. त्याला ओला हायपरड्राइव मोटर असे म्हणतात. हे इलेक्ट्रिक स्कूटर 11.3 HP ची पॉवर आणि 58 NM का पीक टॉर्क देण्यास ही स्कूटर सक्षम आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम