जिल्हा पोलिस दलाच्या वतीने गणेशोत्सवा निमित्त बैठक संपन्न

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २३ ऑगस्ट २०२२ । जळगांव जिल्ह्यात पारंपारिकरित्या गणेश उत्सव साजरा केला जातो. या उत्सवाला प्राचीन परंपरा आहे. दोन वर्षानंतर गणेश भक्तांना आता गणेश उत्सव साजरा करता येणार आहे. त्यामुळे गणेश भक्तांचा उत्साह द्वीगुणित झाला आहे. मात्र प्रशासनाचीही आता जबाबदारी वाढली आहे. गणेश मंडळांना पोलीस स्टेशन मार्फत देण्यात येणारी परवानगी, पेंडालातील लाईट जोडणी यासह इतर अनेक बाबींसाठी गणेश मंडळांना अडचणी येत असतात या अडचणीचे निवारण करुन त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आज जिल्हा पोलिस दलाच्या वतीने मंगलम हॉल येथे बैठक संपन्न झाली.

चॅनेल ला सब्सक्राइब करा
www.youtube.com/channel/UCmsDeG1dRlBB4PL1Pg_SbTQ

सदर बैठकीचे अध्यक्ष स्थान पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी स्वीकारले. या बैठकीला महापौर जयश्री महाजन, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उप अधीक्षक कुमार चिंता हे उपस्थित होते. गणेश पेंडालात लाईट जोडणी करिता जाचक अटी आहेत. त्या शिथिल करत गणेश मंडळांकडून विद्युत जोडणीसाठी घेतलेली अनामत रक्कम मंडळांनी बिल अदा करताच त्यांना परत करण्यात येईल असे नियोजन प्रशासनाने करावे, गणेश मंडळांना वीज जोडणी, परवानगी, यासारख्या बाबींसाठी कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागतात त्यामुळे गणेश मंडळांची हि अडचण दूर करण्यासाठी महापालिका विभाग आणि महावितरण विभाग यांनी समन्वय साधून कामे तत्काळ करुन देण्यात यावी अशा सूचनाही यावेळी डॉ. प्रवीण मुंडे यांनी प्रशासनाला केल्या आहे. येणारा काळ सण उत्सवांचा आहे. कोरोनामुळे दोन वर्षापासुन सार्वजनिक उत्सव बंद होते.

मात्र यंदा हे उत्सव साजरे करता येणार आहे. त्यामुळे सहाजिकच आपला उत्साह द्विगुणीत झाला आहे. मात्र हे उत्सव साजरे करत असतांना जळगांव जिल्ह्याची शांतप्रिय ही ओळख कायम असली पाहिजे. आपण स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा करत आहोत. त्यामुळे स्वातंत्र्यात देशात जगत असतांना जेवढे आपले अधिकार तेवढ्याच आपल्या जबाबदाऱ्याही आहेत.

याची आपण जाण ठेवली पाहिजे अश्या सूचना पोलीस अधीक्षक डॉ. मुंडे यांनी जमलेल्या गणेश मंडळांना केल्या.लोक सहभागातून सी सी टी व्ही कॅमेराची व्यवस्था व्हावी अशी अपेक्षा युवशक्तीचे अमित जगताप यांनी व्यक्त केली.प्रसंगी सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ अध्यक्ष सचिन नारळे, किशोर भोसले, मुकुंद मेटकर, भगत बालाणी, राजेंद्र घुगे पाटील, अयाज अली, फारुक शेख, शहरातील सर्व पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक आणि सर्व गणेश उत्सव समिती व मंडळाचे पदाधिकारी तसेच शांतता कमेटी सदस्य उपस्थित होते. अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांनी शास्त्राचा दाखला देत प्रास्ताविक केले.सूत्रसंचालन अमित माळी यांनी तर आभार पोलीस निरीक्षक अरुण धनावडे यांनी मानले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम