
‘वे ऑफ लाइफ’ चे प्रणेता ध्यानसिद्धा पूजनीय श्रमणीया श्री. अक्षयश्रीजी आखाजी म. सा .यांचे चातुर्मास २०२२ निमित्त प्रवचन सार
दै. बातमीदार । २३ ऑगस्ट २०२२ । गुरुवर्यांनी काल अहंकाराचे फळ मानवाला कशा पद्धतीने अधोगतीकडे नेते हे समजावलं. धन” अहंकार असो की “भाव”अहंकार जीवनातून सोडल्याशिवाय मनुष्य सुखीच होऊ शकत नाही. अहंकाराचा रोडा इहलोक व परलोक दोन्ही दुखी बनवतो,आज गुरुवर्यांनी पुन्हा कर्माची मीमांसा केली प्रत्येक जण आपल्या सुखाची आणि दुसऱ्यांच्या सुखाची कारणं शोधण्यात व्यस्त असतो. माझ्यासोबत असे का चांगलं झालं ?, तर स्वतःला त्याचं श्रेय देतो, पण वाईट झालं तर कारणांची लिस्ट तयार करतो.
आम्ही रोज ऐकतो आज हा गेला, तो गेला मग त्या वेळेला इतक्या सहजतेने त्याचा स्वीकार करतो. त्यावर क्षणिक चिंतन करतो आणि सोडून देतो. मिळालेलं आयुष्य एक दिवस संपणार आहे ही आठवण सदैव असणं हे सत्कर्माचं एक साधन ठरू शकतं. एकदा एका गुरुला शिष्याने विचारलं रोज कसं जगावं? गुरुने समजावलं, उद्या तुझा मृत्यू दिवस आहे, असा तू रोज जग, कारण मृत्यू कधी येणार हे माहित नाही पण ती रोज असणारी जाणीव तुला परिपूर्ण आनंदीमय जगण्याची उभारी देत राहील आणि जगण्याला खरा अर्थ प्राप्त होईल.
चॅनेल ला सब्सक्राइब करा
www.youtube.com/channel/UCmsDeG1dRlBB4PL1Pg_SbTQ

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम