भिडेच्या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री पवार म्हणाले…

बातमी शेअर करा...

बातमीदार | २ ऑगस्ट २०२३  | राज्यात गेल्या आठ दिवसापासून बेताल वक्तव्य करण्यासाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे प्रमुख मनोहर उर्फ संभाजी भिडे हे मोठ्या चर्चेत होते. त्यानंतर त्यांच्यावर राष्ट्रवादी, काँग्रेससह अनेक पक्षांनी आंदोलने देखील केली पण केवळ संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना अटक करावी अशी देखील मागणी जोर धरीत असून यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाष्य केले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले कि, “संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल झालाय. अहो, एफआयआर दाखल झाल्यानंतर चौकशी होणार ना? चौकशी झाल्यानंतर पोलीस कुठल्या कलमाखाली काय करायचं याबाबत पुढची अॅक्शन घेणार”, “राज्यात कुठल्याही महापुरुषांबद्दल कुणीही वाचाळवीरांनी असं बेताल वक्तव्य केलेलं कोणतंही सरकार खपवून घेणार नाही. त्या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीदेखील तीच भूमिका आहे. माझीही तीच भूमिका आहे. मंत्री छगन भुजबळ यांनीदेखील आपली भूमिका मांडली”, असं देखील अजित पवार म्हणाले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम