ऐन दिवाळीत जनता करणार महागाईचा सामना

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १३ ऑक्टोबर २०२२ ।  ऐन सणासुदीच्या तोंडावर लोकांची या झालेल्या महागाई मधून सुटका होणार नसल्याचे चित्र आता तरी जाणवत आहे. सप्टेंबर महिन्यातील महागाईचे दर बुधवारी केंद्र सरकारने जाहीर केले. त्यानुसार किरकोळ महागाई दर (सीपीआय) ७.४१ टक्क्यांवर गेला आहे. अॉगस्ट महिन्यात हा दर ७ टक्क्यांवर होता. एप्रिल महिन्यानंतर (७.७९ टक्के) हा दर सर्वात जास्त आहे. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत हि जनतेला महागाईचा सामान करावा लागणार आहे.

वाढत्या किमती आटोक्यात ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँकेने व्याजदर वाढवले तरीही सलग तिसऱ्या महिन्यात महागाई वाढली आहे. महागाईचे दर २ ते ६ टक्क्यांपर्यंत मर्यादित ठेवण्याचे उद्दिष्ट रिझर्व्ह बँकेने ठेवले होते, परंतु सलग नवव्या महिन्यात हे उद्दिष्ट गाठता आले नाही. सप्टेंबर महिन्यात भाज्या १८ टक्के, मसाले १६.८, खाद्य व पेय पदार्थ ८.४१, चपला-बूट १२.३०, कपडे १०.१७ आणि इंधन व ऊर्जा १०.३९ टक्के महागले आहे. विशेष म्हणजे या काळात शहर आणि ग्रामीण भागातही अन्नपदार्थांच्या किमती वाढल्या आहेत. औद्योगिक उत्पादनात घट : औद्योगिक निर्मिती आणि खाणकाम क्षेत्रात उत्पादनात घट झाल्याने देशाचे औद्योगिक उत्पादन (आयआयपी) ऑगस्ट महिन्यात ०.८ टक्के घटले आहे. दीड वर्षातील हा नीचांक आहे. वर्षभरापूर्वी याच महिन्यात औद्योगिक उत्पादन १३ टक्के वाढले होते, तर या वर्षी जुलै महिन्यात २.२ टक्के वाढ झाली होती.

रिझर्व्ह बँकेला द्यावे लागणार स्पष्टीकरण : महागाईचा दर ६ टक्क्यांपेक्षा अधिक असल्याने रिझर्व्ह बँकेला स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे. २ ते ६ टक्क्यांचे लक्ष्य का हुकले याचा सविस्तर अहवाल केंद्र सरकारला सादर करावा लागणार आहे. दरम्यान, अमेरिकी मानांकन संस्था एस अँड पीने भारतात मार्चपर्यंत महागाईचे दर अधिक राहतील. मार्च २०२३ मध्ये ६.८ पर्यंत राहील तथापि २०२३-२४ या आर्थिक वर्षात ती ५, तर त्यानंतर २४-२५ मध्ये ४.५ टक्क्यांपर्यंत आटोक्यात येऊ शकेल, असा अंदाज वर्तवला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम