दिवाळीत उर्फी जावेद अस काही केल कि ट्रोल करणाऱ्यांनी कौतुकच केल

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २६ ऑक्टोबर २०२२ । सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असलेल्या उर्फी जावेद नेहमीच ती चित्रविचित्र फॅशन सेन्समुळे उर्फी नेहमीच चर्चेत असते. अनेकदा तिला तिच्या अतरंगी आऊटफिटमुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. मात्र सध्या उर्फीचा असा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, जो पाहून नेटकरी चक्क तिचं कौतुक करत आहेत. उर्फीचा हा व्हिडीओ पापाराझींनी विविध अकाऊंट्सवर पोस्ट केला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये उर्फी पारंपरिक ड्रेसमध्ये पहायला मिळतेय. उर्फीने ऑफ शोल्डर कुर्ता आणि त्यावर नेटचा दुपट्टा परिधान केला आहे. दररोज उर्फीचे फोटो आणि व्हिडीओ क्लिक करणाऱ्या पापाराझींना तिने दिवाळीनिमित्त मिठाई दिली आहे. याच व्हिडीओत उर्फी मिठाईचं वाटप करत असताना एक महिला तिच्या जवळ येते. त्या महिलेला उर्फी तिच्या पाकिटातून पैसे काढून देताना दिसतेय. त्याचसोबत उर्फी तिला मिठाईचा बॉक्ससुद्धा देते.

 

 

उर्फीचा हा व्हिडीओ आणि त्यात तिचा दिलदारपणा पाहून नेटकरी तिचं कौतुक करत आहेत. ‘काहीही असो, उर्फी मनाची चांगली आहे’, असं एकाने म्हटलंय. तर ‘लोकांनी काहीही म्हटलं तरी हिचं मन साफ आहे’, असं दुसऱ्या युजरने लिहिलं. ‘जे खरं आहे ते तोंडावर बोलते, पण उर्फीचं मन खूप चांगलं आहे’, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी तिचं कौतुक केलं आहे. बिग बॉस ओटीटीमध्ये सहभागी झाल्यानंतर उर्फी जावेद प्रकाशझोतात आली. त्याआधी तिने काही मालिकांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. उर्फी नेहमीच तिच्या फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. इन्स्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम