काय सांगता! बिग बॉसच्या घरात सौ.फडणवीस !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २६ ऑक्टोबर २०२२ । संपूर्ण देशभरात दिवाळीचा उत्साह असताना बिग बॉसच्या घरातही हा सण धूमधडाक्यात साजरा करण्यात येत आहे. सिने अभिनेत्यासह सध्या बिग बॉस मराठीचं चौथं सिझन सध्या रंगतदार वळणावर येऊन पोहोचलं आहे. दिवाळीनिमित्त बिग बॉसच्या घरात खास पाहुणीला आमंत्रित करण्यात आलं आहे. ही पाहुणी आहे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी, समाजसेविका आणि गायिका अमृता फडणवीस. अमृता फडणवीस यांच्या उपस्थितीत घरातील सदस्य मोठ्या जल्लोषात दिवाळी साजरी करणार आहेत.

बिग बॉसच्या घरात अमृता फडणवीस यांच्यासमोर सदस्यांचं साप्ताहिक कार्य रंगलं. यावेळी किरण माने आणि यशश्री यांनी अमृता यांना काही प्रश्नदेखील विचारले. या प्रश्नांची उत्तर अमृता यांनी मनमोकळेपणाने दिली.

देवेंद्रजींचा फराळातला आवडता पदार्थ कुठला, असा प्रश्न यशश्रीने अमृता यांना विचारला. त्यावर उत्तर देताना अमृता म्हणाल्या, “देवेंद्रजींना मोदक आणि करंजी खूप आवडतात.”
यावेळी किरण माने यांनी राजकारणाशी संबंधित मजेशीर प्रश्न विचारला. “तुम्हाला माहितच असेल की बिग बॉसच्या घरात कॅप्टनपद खूप महत्त्वाचं असतं. पण बिग बॉसच्या घराबाहेर महाराष्ट्राचा कॅप्टन कोण आहे”, असं त्यांनी विचारलं.

किरण माने यांच्या प्रश्नाचं उत्तर देताना अमृता म्हणाल्या, “मी तुम्हाला दोन नावं सांगेन, जे महाराष्ट्राचे कॅप्टन आहेत. त्यापैकी एक प्रॅक्टिकल आणि एक इमोशनल कॅप्टन आहे. एकनाथजी शिंदे आणि देवेंद्रजी फडणवीस हे दोघं राज्याचे कॅप्टन आहेत.”

बिग बॉस मराठीच्या या दिवाळी स्पेशल एपिसोडमध्ये अमृता फडणवीस यांनी ‘कजरा रे कजरा रे’ या गाण्यावर ठेकासुद्धा धरला. बिग बॉसच्या घरातील ही धमाल मजा प्रेक्षकांना सोमवार ते शुक्रवारी रात्री 10 वाजता आणि शनिवार-रविवारी रात्री 9.30 वाजता पहायला मिळणार आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम