
त्या दिवशी अचानक बेडरूमची जमीन फाटली पलंगासह शंभर फूट आत गेली व्यक्ती…
दै. बातमीदार । २१ एप्रिल २०२३ । जगात कोणती घटना कधी घडेल हे कुणीही सांगू शकत नाही पण त्याचे काही दिवसानंतर अचानक सोशल मिडीयावर व्हिडीओ व्हायरल होतात त्यावेळेला आपल्याला काही नवल वाटायला नको. जगभरात अशा अनेक घटना घडत असतात ज्याच्यावर विश्वास ठेवणंही कठिण आहे. काही घटनांचे गुढ तर वर्षोनुवर्षे समोर येत नाही. अशाच एका घटनेविषयी आज तुम्हाला सांगणार आहोत. ज्यामध्ये एक व्यक्ती गेल्या 10 वर्षांपासून गायब आहे. ही घटना ऐकून तुम्हीही हैराण व्हाल. हे नेमकं प्रकरण काय आहे याविषयी जाणून घेऊया.
दहा वर्षांपूर्वी अमेरिकेतील फ्लोरिडा येथे राहणारा एक व्यक्ती शंभर फूट खोल सिंकहोलमध्ये बुडाला होता. त्यानंतर तो आजतागायत सापडला नाही. ज्या ठिकाणी ही घटना घडली, ती जागा रिकामी करण्यात आली. त्या व्यक्तीचा शोध घेण्याचे अनेक प्रयत्न केले पण सर्व निष्फळ ठरले.
आता त्या व्यक्तीला मृत घोषित करण्यात आले आहे. ही घटना 2013 मध्ये घडली आहे. ही घटना घडलेल्या व्यक्तीचं नाव जेफ्री होतं. एका न्यूजला दिलेल्या मुलाखतीत त्याचा भाऊ जेरेमी याने संपूर्ण घटनेचे तपशीलवार वर्णन केले.त्याने सांगितले की, घटनेच्या दिवशी तो त्याच्या भावासोबत खोलीत होता. अचानक त्याच्या अंथरुणात खळबळ उडाली. काही वेळातच त्याचा पलंग जमिनीखाली जाऊ लागला. जेफ्री त्याच्या भावाचे नाव घेत होता.
या घटनेची आठवण करून देताना जेरेमीने सांगितले की, तो माझे नाव घेत होता. मला माझ्या भावाला मदत करायची होती पण काहीही करू शकत नाही. या घटनेनंतर टँपा पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली. जेरेमीला सिंकहोलमधून खेचले गेले पण जेफ्री कुठेच सापडला नाही.
बराच वेळ त्याचा शोध घेण्यात आला मात्र तो कोणताही मागमूस न घेता बेपत्ता झाला. अनेक दिवस शोध घेतल्यानंतर पोलिसांनी कारवाई मागे घेतली. यानंतर ही जमीन रिकामी करण्यात आली. या घटनेला दहा वर्षे झाली आहेत, पण जेरेमीला अजूनही त्याचा भाऊ सिंकहोलमध्ये असल्यासारखे वाटते. दरम्यान, जगभरात अशा अनेर घटना घडत असतात ज्याचा आपण विचारही करु शकत नाही. अनेक तर चित्रपटाच्या कथापेक्षाही भयानक असतात.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम