नगरदेवळ्यात भाजपा तर्फे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाडा अंतर्गत भव्य नेत्र तपासणी शिबिर

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २७ सप्टेंबर २०२२ । नगरदेवळा ता.पाचोरा – देशाचे लोकप्रिय पंतप्रधान राष्ट्रनेता माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ते राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती पर्यंत भारतीय जनता पार्टीच्या वतीने राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले होते. पाचोरा तालुक्यात या सेवा पंधरवड्याच्या अंतर्गत विविध लोकाभिमुख उपक्रम राबविले जात आहे.त्याचाच एक भाग म्हणून खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाने आज नगरदेवळा येथे भारतीय जनता पार्टी व पुणे अंदजन मंडळ संचलित कांता लक्ष्मी शहा नेत्र रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज सोमवार दि.२६ सप्टेंबर रोजी नगरदेवळा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आखतवाडे रोड,नगरदेवळा येथे भव्य नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन जळगाव लोकसभेचे युवा खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या हस्ते तर भाजपा तालुकाध्यक्ष अमोलभाऊ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत या नेत्र तपासणी शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.या नेत्र तपासणी शिबिरामध्ये दिवसभरात ३५० गरजू रुग्णांनी डोळ्यांची तपासणी केली. यामधून १४० रुग्णांची लवकरच मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

या शिबिराच्या यशस्वीतेसाठी भारतीय जनता पार्टी नगरदेवळा शहर व नगरदेवळा-बाळद जिल्हा परिषद गट मधील सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. नगरदेवळा शहरासह परिसरातील गरजू नागरिकांनी या शिबिराच्या आयोजनाबद्दल यावेळी समाधान व्यक्त केले. याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे तालुका सरचिटणीस गोविंद शेलार, सेवा पंधरवाडा समितीचे तालुका संयोजक सुनील पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख हिम्मतसिंग निकुंभ, तालुका उपाध्यक्ष महेश पाटील, नगरदेवळा सरपंच प्रतीक्षा काटकर, नामदेव पाटील, भरत पाटील, वैद्यकीय अधिकारी वीरेंद्र पाटील, किरण काटकर, राजेंद्र पवार, राजेंद्र महाजन, सुनील राऊळ, बापू चौधरी, मनोज पाटील, किशोर पाटील, शंकर राऊळ, सागर पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
खासदार उन्मेश दादा पाटील यांनी शिबिरात आलेल्या सर्व जेष्ठ रुग्णांची आस्थेवाईकपणे चौकशी करीत संवाद साधला

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम