
“कल्याणची चुलबुली” चा नृत्याविष्कार पाहून विसराल भान
दै. बातमीदार । २७ सप्टेंबर २०२२ । आपल्या अभिनयाने व विनोदाच्या टायमिंगने प्रत्येकाला खळखळून हसवणारी छोट्या पडद्यावरील “कल्याणची चुलबुली” म्हणजेच हास्यकलाकार अभिनेत्री शिवाली परब ही नेहमी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत तिचे फोटोज, व्हिडीओज शेअर करत असते.
नवरात्रीच्या निमित्ताने तिने “रंग लागला” या मराठी गाण्यावर गरबा नृत्य करीत इन्स्टाग्राम रिल्स तयार केला आहे. तिचा हा नृत्याविष्कार पाहून अनेक जण लाईक्ससह कंमेंट्सचा वर्षाव करीत आहेत.
शिवाली हिने अनेक मराठी चित्रपटातही काम केले असून, तिला सर्वाधिक प्रसिद्धी “महाराष्ट्राची हास्यजत्रा” या हास्य कार्यक्रमाने दिली आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम