नवी मोटरसायक चोरी झाल्याने गावात पुन्हा एकदा खळबळ

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २७ सप्टेंबर २०२२ । कजगाव ता. भडगाव येथील देविदास सुखदेव महाजन यांची गाडी नंबर एम एच १९ डी यु ३५८८ बजाज प्लॅटिना ही दुचाकी भर संध्याकाळी रहदारीच्या ठिकाणाहून चोरी झाल्याची घटना घडली आहे.

देविदास महाजन यांचा मुलगा सागर हा दिनांक २६ सप्टेंबर २०२२ रोजी संध्याकाळी साडे सात ते आठ वाजेच्या दरम्यान स्टेशन रस्त्यावर गाडी लावून आपले काम आटोपून परत आल्यावर त्याला गाडी हरवल्याचे लक्षात आले त्याने सर्वत्र शोध घेतला असता गाडी आढळून आली नाही. त्यामुळे देविदास महाजन यांनी भडगाव पोलीस स्टेशन ला गाडी हरवल्याची नोंद केली आहे. यापूर्वी गावात अनेक ठिकाणी मोटार सायकल चोरीच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यातच आता भर संध्याकाळी ही नवी मोटरसायक चोरी झाल्याने गावात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम