कजगाव ता. भडगाव येथील बस स्थानक समोरील अतिक्रमण मोठ्या पोलीस बंदोबस्तात काढण्यात आले

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २७ सप्टेंबर २०२२ । कजगाव ता. भडगाव येथील बस स्थानक समोरील अतिक्रमण दि. २७ रोजी मोठ्या पोलीस बंदोबस्तात काढण्यात आले. अतिक्रमण धारकांनी स्वताच आपले अतिक्रमण काढुन घेतले या मुळे बस स्थानक आवारात मोकळा श्वास घेतला नागरिक मध्ये समाधान व्यक्त होत आहे.
बाबत वृत्त की कजगाव येथील बस स्थानक समोरील अतिक्रमण काढण्यात यावे या मागणी साठी येथील भुषण पाटील यांनी गेल्या वीस दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालय आवारात आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता. या मागणीचा विचार करत कजगाव बस स्थानक समोरील अतिक्रमण काढण्या बाबत हालचाली सुरू झाल्यानंतर दि. २७ रोजी बस स्थानक समोरील अतिक्रमण काढण्यात आले.

BJP add

सकाळी अतिक्रमण काढण्यासाठी लागणारा पोलीस बंदोबस्त कजगाव येथे पोहचल्या नंतर अतिक्रमण धारकांना बारा वाजे पर्यंत अतिक्रमण काढुन घेण्याचे सांगितले त्या प्रमाणे अतिक्रमण धारकांनी स्वत हून आपले अतिक्रमण काढुन घेत बस स्थानक समोरील पटांगण मोकळे केले.

पोलिसांचा मोठा लवाजमा
बस स्थानक चं अतिक्रमण काढण्यासाठी पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला होता यात भडगाव पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक अशोक उतेकर पोलिस निरीक्षक, चंद्रसेन पालकर, फौजदार गणेश वाघमारे, एएस आय राजेंद्र पाटील, एफएसआय कैलास गिते, हवालदार जिजाबराव पवार, पोलिस नाईक नरेंद्र विसपुते, हवालदार पंचशिला निकम, हवालदार शमिला पठाण, पोलिस निरीक्षक, चंद्रसेन पालकर, फौजदार गणेश वाघमारे, एएस आय राजेंद्र पाटील, एफएसआय कैलास गिते , हवालदार जिजाबराव पवार, पोलिस नाईक नरेंद्र विसपुते, हवालदार पंचशिला निकम, हवालदार शमिला पठाण ग्रामविकास अधिकारी नारायण महाजन, विस्तार अधिकारी बी एन पाटील, लिपिक संजय पाटील, लिपिक, सुनील पवार, शिपाई रविंद्र माळी,व मनोज सोनावणे, रघुनाथ पाटील,जाकिर मन्यार जळगाव येथील दंगा नियंत्रक पथक कजगाव पोलीस मदत केंद्राचे पोलीस कर्मचारी, भडगाव, चाळीसगाव शहर,चाळीसगाव ग्रामीण या पोलीस स्टेशन चे पोलीस कर्मचारी असे चाळीस पोलीस कर्मचारी अधिकारी यांचा समावेश होता अतिक्रमण हटाव प्रसंगी नागरिकांची बघ्याची मोठी गर्दि बस स्थानक चौकात जमली होती

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम