बातमीदार | २२ ऑगस्ट २०२३ | राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी चांगलाच अडचणीत आल्याने राज्यातील मंत्री देखील आता कामाला लागले आहे. कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी थोड सुखावला होता. त्यातच केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर शुल्क लावण्याने शेतकऱ्यांनी नारजी व्यक्त केली आहे. महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी सध्या आंदोलनाच्या पवित्रात आहेत. अनेक कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये काद्यांचे लिलाव सध्या बंद पाडण्यात आले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर केंद्र सरकारला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या भावना सांगण्यासाठी राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे आज दिल्ली दोऱ्यावर जाणार आहेत. ते केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांची भेट घेणार आहेत.
सध्या कांदा निर्यात शुल्कच्या मुद्यावरुन राज्यातील शेतकरी चांगलेच आक्रमक झाले आहेत. केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर 40 टक्के शुल्क लावले आहे. याविरोधात राज्यात अनेक शेतकरी आंदोलन करत आहेत. या मुद्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे हे दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. या माध्यमातून कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या दिलासा देण्याचा प्रयत्न मुंडे करणार आहेत. मात्र, या दौऱ्यात काही ठोस निर्णय होण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे त्यांच्या या दौऱ्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
कांदा उत्पादक शेतकरी गेल्या वेळी अडचणीत सापडला होता. या वेळी त्याला थोडा दिलासा मिळण्याची आशा होती. त्यातच केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर 40 टक्के शुल्क लावला. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट निर्माण झाली आहे. केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात शुल्क तात्काळ रद्द करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. यावर बोलताना कृषी मंत्री धनंजय मुंडे म्हणाले की, मी केंद्रीय मंत्र्यांच्या संपर्कात आहे. शेतकऱ्यांचा हितासाठी दिल्लीला जाऊन केंद्रीय कृषी मंत्र्यांची भेट घेणार आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, यासाठी नक्कीच आम्ही मार्ग काढू, असा विश्वास देखील धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांना दिला.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम