राष्ट्रवादीचा फक्त आणि फक्त मी एकमेव अध्यक्ष : शरद पवार

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ७ जुलै २०२३ ।  पक्षावर कोणीही दावा करू द्या, कोणीही काहीही बोलत असेल त्याला काही तथ्य नाही, दिल्लीत झालेल्या बैठकीत 11 जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. आम्हाला निवडणूक आयोगाकडून न्याय मिळेल. राष्ट्रवादीचा मी एकमेव अध्यक्ष आहे. त्यामुळे आम्हाला आयोग आम्हाला योग्य तो न्याय मिळेल, असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला. जर तसे झाले नाही तर आम्ही आयोगाव्यतिरिक्त अन्य संस्थांकडून जाऊ, असे बोलत पवारांनी आपल न्यायालयातही जाऊ शकतो, असे संकेत दिले आहेत.

दिल्लीत राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाल्यावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शरद पवार पुढे म्हणाले की, विचारधारा सोडून जे लोक बाहेर पडले आहेत. त्यांचा सर्व कार्यकारिणीने विरोध केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवत दोन खासदार आणि नऊ आमदारांच्या निलंबनाचं निलंबन करण्यात आलं आहे. दोन खासदारांमध्ये प्रफुल पटेल व सुनील तटकरे यांचा समावेश आहे. या बैठकीत राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय समितीने एकूण ८ ठराव मंजूर केले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्हाच्या मुद्द्यावर निवडणूक आयोगाकडे जाणार असल्याचे शरद पवार म्हणाले. पवारांना निवृत्तीबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, वय 82 असो वा 92, वयाने फरक पडत नाही. मी पक्षाची पुनर्बांधणी करेन. कुणाला (अजित पवार) मुख्यमंत्री व्हायचे असेल तर आम्हाला काहीच अडचण नाही. माझ्या शुभेच्छा त्याच्यासोबत आहेत. शरद पवार यांच्या आधी राष्ट्रवादीचे नेते पीसी चाको यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सर्व नेते शरद पवार यांच्या पाठीशी असल्याचे ते म्हणाले. शरद पवार म्हणाले, एक गोष्ट खरी आहे की, 2019 मध्ये काही लोकांनी त्यांच्या सह्यांचं एक पत्र दिलं होतं. त्यात पक्षाचं पुढील धोरण काय असावं, कुणाबरोबर युती करावी यावर चर्चा करण्याची गरज आहे, असं म्हटलं. त्यावर मी बैठक बोलावं असं म्हटलं होतं. मात्र, नंतर पुढे निवडणूक आली आणि त्यावर काहीही चर्चा झाली नाही. दिल्लीत झालेल्या बैठकीत 27 राज्यातील राष्ट्रवादी कार्यकारिणीचे पदाधिकारी उपस्थित होते.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचा मी अध्यक्ष आहे. बाकी सर्व गोष्टीला काही अर्थ नाही. अजित पवार गट काहीही म्हणू शकतो. कोणी काहीही म्हणेल त्याला काही महत्त्व नाही किंवा अजिबात थारा देखील नाही. असे शरद पवार म्हणाले. ईडी, सीबीआयचा दबावामुळे देशात किती पक्ष तुटले? यावर बोलताना पवार म्हणाले की, किती पक्ष फोडले हे मला सांगता येणार नाही. मात्र, कायम ईडी, सीबीआय यासह अन्य संस्थांद्वारे विविध राज्यात विरोधकांवर दबाव आणला जात आहे. परंतू यामुळे लोकांच्या नाराजी पसरत आहे.
शरद पवार म्हणाले की, 2024 मध्ये महाराष्ट्रा चित्र बदलले असेल. कारण, तपास यंत्रणांचा वापर करून ज्या पद्धतीने राजकारण सुरू आहे. त्याला देशातील जनता नक्की नाकारेल. द्वेषाचे राजकारण करणाऱ्यांना निवडणूकीत चफराक बसल्याशवाय राहणार नाही. असे पवार म्हणाले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम