विद्यार्थ्यांना घेता येणार दोन पदव्या एकाच वेळी !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ७ जुलै २०२३ । राज्यातील अनेक विद्यार्थी शिक्षणाच्या दोन वेगवेगळ्या पदव्या घेण्यासाठी कित्येक वर्ष आपली खर्ची खालत असतात. पण आता नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० हे एमजीएम विद्यापीठात लागू करण्यात आले आहे. या धोरणानुसार एकाच वेळी विद्यार्थ्यांना दोन पदव्या घेता येणार आहेत. त्यासाठी आवश्यक असलेले क्रेडिटस् विद्यार्थ्यांना पूर्ण करावे लागणार असल्याची माहिती एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास सपकाळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.

एमजीएम विद्यापीठाने नव्या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती देण्यासाठी प्रशासकीय इमारतीमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी कुलगुरू डॉ. सपकाळ म्हणाले. तंत्रज्ञानाच्या युगामध्ये नागरिकांना ग्लोबल सिटिझन बनविण्याच्या उद्देशाने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल होत आहे. या बदलांना एमजीएम विद्यापीठ प्रभावीपणे सामोरे गेले असून, अंमलबजावणीस सुरुवात झाल्याचेही त्यांनी सांगितले. विद्यापीठातील सात विद्याशाखा असून, एकदा विद्यार्थ्याने विद्यापीठात प्रवेश केल्यानंतर त्याला कोणत्याही विद्याशाखेत शिक्षण पूर्ण करता येणार आहे. या शाखांमधील मेजर आणि मायनर विषय निवडण्याचे स्वातंत्र्य विद्यार्थ्यास असणार आहे. त्यानुसार एकाच वेळी दोन पदव्याही विद्यार्थ्यांना घेता येऊ शकतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम