राज्यात गृहमंत्र्यांच्या नावे मोगलाई ; संजय राऊत !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १ मे २०२३ ।  राज्यातील ठाकरे गट व भाजप नेत्यामध्ये वाक्ययुद्ध सुरु असतांना आज पुन्हा एकदा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी थेट भाजपच्या नेत्यावर टीका केली असून त्यावर कारवाईसाठी गृहमंत्री फडणवीस यांना पत्र दिले आहे. महाराष्ट्रात गृहमंत्र्यांच्या नावे मोगलाई सुरू आहे. भाजपचे नेते कायद्यापेक्षा मोठे आहेत का, असा थेट सवाल शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक खरमरीत पत्र पाठवून केला आहे.
पुणे पोलिसांनी ऑस्कर पुरस्कार विजेता संगीतकार ए. आर. रहमान यांना रात्री दहा वाजेनंतर कार्यक्रम करू दिला नाही. मात्र, भाजपचा नेता पहाटे साडेतीनपर्यंत बारमध्ये नाचतो. कायदा सर्वांना समान नाही का, भाजपचे नेते कायद्यापेक्षा मोठे आहेत का, अशा फैरीही राऊत यांनी झाडल्यात.

संजय राऊत आपल्या पत्रात म्हणतात की, २९ एप्रिल २०२३ रोजी पहाटे लिंक रोड, खार पश्चिम येथे घडलेल्या घटनेकडे मी आपले लक्षवेधीत आहे. मुंबईत रेस्टॉरंट द्वार साधारण १ वाजेपर्यंत चालू ठेवण्याची परवानगी असताना सदर ‘रेडिओ’ बार पहाटे ३.३० वाजेपर्यंत चालू होता व आतील गाण्यामुळे आजूबाजूच्या परिसरात त्रास होऊ लागला. बाहेर ट्रॅफिक जाम झाले म्हणून संभाजी ब्रिगेडचे सचिन कांबळे हे आत जाऊन विनंती करू लागले. तेव्हा त्यांच्यावरच जबरदस्ती व धक्काबुकीचा प्रयत्न झाला. बारमध्ये मोठ्या प्रमाणात मुली होत्या व त्यांच्या गराड्यात भाजपचे एक तरुण नेते मोहित कंबोज हे मद्यधुंद अवस्थेत होते.

संजय राऊत आपल्या पत्रात पुढे म्हणतात की, श्री. कांबळे यांनी पोलिसांना पाचारण केले, पण मोहित कंबोज हे वर्दीतल्या पोलिसांशी दादागिरीच्या भाषेत अर्वाच्य पध्दतीने बोलू लागले. काही पोलिसांना धमक्या दिल्या. “हिंमत असेल तर मला येथून बाहेर काढून दाखवा मी आता देवेंद्रला फोन करतो बघा.” असे तो राज्याच्या गृहमंत्र्यांच्या नावाने धमकावू लागला व पोलिस हतबलतेने हा सर्व तमाशा अपमानित होऊन पाहत राहिले. पोलिसांसमोर कंबोज हे त्याही अवस्थेत दारू पित राहिले. याबाबतचे हॉटेल व बाहेरचे सीसी टीव्ही फुटेज त्वरित पोलिसांनी जप्त करावेत. कंबोज हे वारंवार देवेंद्र फडणवीस, अमित शहा यांचा उल्लेख करीत असल्याने पोलिस दबावाखाली आले. ही बाब कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने गंभीर आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम