केसातील चिकटपणा दूर करायचा आहे ; हे उपाय करा !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १ मे २०२३ ।  प्रत्येक महिला आपल्या केसासाठी नेहमीच चांगले शाँम्पू वापरत असतात. पण काही काही शाँम्पू मधून त्यांची अडचण दूर होत नाही तर आणखी वाढत जात असते. शाँम्पू केल्यावर देखील त्यांचे केस चिकट होतात आणि गुंततात. तुम्हाला देखील ही समस्या असेल तर तुम्ही किचनमधील काही गोष्टींची मदत घेऊन केसांचा चिकटपणा दूर करू शकता.त्यासाठी पुढील कृती बघा..

साहित्य :-
२ ग्रीन टी बॅग
५ पुदीन्याची पाने
५०० एमएल पाणी

एका लिंबाचा रस

असा करा तयार :- ग्रीन टी च्या दोन बॅग, ५ पुदीन्याची पाने ५०० एमएल पाण्यात उकडून घ्या. आता यात लिंबाचा रस मिश्रित करा. हे मिश्रण गाळून एका भांड्यात काढा. आता या मिश्रणाने केस आणि खासकरुन डोक्याची त्वचा धुवा. याने केसांना चिकटलेलं ऑइल आणि डोक्याच्या त्वचेचं ऑइल निघून जाईल. यात उपयोग केलेला लिंबूमध्ये एक नैसर्गिक एस्ट्रीजेंट आहे, जे तुमच्या डोक्याच्या त्वचेवरुन ऑइल दूर करण्याचं काम करतात. सोबतच ग्रीन टी आणि पुदीन्यामुळे तुमचे केस नरिश होतात. तसेच केसांची अॅंटी-बॅक्टेरिअल आणि अॅंटी-फंगल गुणांमुळे इन्फेक्शनपासून बचाव केला जातो.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम