विधिमंडळाच्या पायरीवर कांदाप्रश्नी विरोधक आक्रमक !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २८ फेब्रुवारी २०२३ । मुंबई विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधक सत्ताधारी भाजप आणि शिंदे यांच्याविरोधात आक्रमक झाला. कांदा आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा, या मागणीसाठी विरोधी पक्षाच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवरच जोरदार घोषणाबाजी सुरु केली.

कापसाला आणि कांद्याला योग्य भाव मिळत नाहीये, त्यामुळे हा शेतकरी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे, याकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी विरोधकांनी आंदोलन केलं. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस आमदारांनी डोक्यावर कापसाची टोपी, गळ्यात कांद्याच्या माळा अशी वेशभूषा करत विधिमंडळ पायऱ्यांवर आज जोरदार घोषणाबाजी केली. शेतकऱ्यांना योग्य भाव दिला नाही तर हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा विरोधकांनी दिला.

विधिमंडळ परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी अनोखी वेशभूषा केली. त्यांनीदेखील गळ्यात कांद्याची माळ घातली होती. तसेच डोक्यावर कांद्याचं टोपलं घेऊनच ते फिरू लागले. शेतकऱ्यांच्या कांद्याला योग्य भाव दिला नाही तर सरकारला कांद्यासारखं सोलून काढू, असा कठोर इशारा त्यांनी दिला. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हेदेखील या आंदोलनात सहभागी झाले. ज्या पद्धतीने विरोधी पक्षनेत्यांनी आवाज उठवला. १ रुपया उत्पन्न आहे आणि ७ ते ८ रुपयांनी कांदा बाहेर विकला जात आहे. कापसाचीही तीच स्थिती आहे. शेतकऱ्याचा कांदा सरकारने विकत घेतला पाहिजे, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात आली.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम