‘लोकशाहीची हत्या’ म्हणत विरोधकांनी केले मूक आंदोलन !

advt office
बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २५ मार्च २०२३ ।  देशात कॉंग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांची नुकतेच खासदारकि रद्द केल्याने देशातील राजकारण चांगलेच तापताना दिसत आहे. आज राज्यातील विधीमंडळाच्या आवारात विरोधकांनी तोंडाला काळ्या फिती लावून मूक आंदोलन केलं. यावेळी हातात निषेधाचे फलक घेऊन विरोधकांनी कोणतीही घोषणाबाजी न करता आंदोलन केलं. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलो यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं.

राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे. दरम्यान, कालच राहुल गांधी यांची खासदारकी लोकसभा सचिवालयानं रद्द केली. यापार्श्वभूमीवर विरोधकांनी तोंडाला काळी रिबीन बांधून पायऱ्यांवर आंदोलन केलं. राहुल गांधींवर झालेली कारवाई ‘लोकशाहीची हत्या’ असे बोर्ड घेऊन कोणतीही घोषणा न देता विरोधक मूक आंदोलन करत आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम