ठाकरेंच्या सभेला मुस्लिम समाजही येणार ; संजय राऊत !

advt office
बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २५ मार्च २०२३ ।  मालेगाव येथे उद्धव ठाकरे यांची उद्या रविवारी सभा होत आहे. सभेच्या तयारीसाठी संजय राऊत हे सध्या मालेगावातच मुक्कामी आहेत. सभेबाबत माहिती देताना त्यांनी आज पत्रकार परिषदेत भाजपसह राज ठाकरे व नारायण राणेंवरही शेलक्या शब्दांत टीका केली.

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत म्हणाले कि, या देशातील मुसलमान हा राष्ट्रभक्त आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका लोकशाहीसोबतच हिंदुत्वालाही मारक ठरत आहे, मालेगाव येथे उद्धव ठाकरेंच्या सभेला मुस्लिम समाजही मोठ्या संख्येने येईल. हा देश सर्वांचा आहे. देशातील कुणालाही विरोध करण्याचे कारण नाही. या देशातील सर्व जातीधर्मीयांना शिवसेनेचे, उद्धव ठाकरेंचे नेतृत्व स्वीकारायचे आहे. उद्धव ठाकरे हे सर्वांना सांभाळून घेणारे नेते आहेत. त्यामुळे उद्या उद्धव ठाकरे यांच्या सभेला लाखाहून अधिक गर्दी होईल. मालेगाव हा शिवसेनेचा बालेकिल्ला होईल.

संजय राऊत म्हणाले, शिवसेनेत झालेल्या गद्दारीमुळे शिवसैनिकांमध्ये प्रचंड चीड आहे. या संतापाचा उद्रेक उद्याच्या सभेत झालेला दिसेल. नियोजन एक लाख जणांचे केले असले तरी सभेचा उत्साह पाहता एक लाखाहून अधिक गर्दी होईल. मालेगावातील जनता उद्धव ठाकरेंना एकण्यासाठी, पाहण्यासाठी उत्सुक आहेत. उद्धव ठाकरेंची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे. तिचे खरे रुप उद्या मालेगावातील जनता पाहील.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम