भरधाव चारचाकी पुलावरून रेल्वे ट्रॅकवर कोसळली; तीन जागीच ठार !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ७ नोव्हेबर २०२३

राज्यातील अनेक महामार्गावर अपघाताची मालिका सातत्याने घडत असतांना नुकतेच कर्जत-नेरळ मार्गावर एक भयानक घटना घडली आहे. कर्जतहून नेरळच्या दिशेने निघालेली कार किरवली पुलावरून थेट रेल्वे ट्रॅकवर कोसळली. त्याचवेळी समोरून येणाऱ्या मालगाडीने कारला जोरदार धडक दिली. या भयानक घटनेत तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काळजाचा ठोका चुकवणारी ही घटना आज म्हणजेच मंगळवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास घडली. अपघातातील मृतांची नावे अद्याप समोर आलेली नाही.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त कार कर्जतहून नेरळच्या दिशेने जात होती. या कारमधून पाच ते सहा जण प्रवास करीत होते. दरम्यान, कार किरवली पुलाजवळ आली असता, चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. क्षणार्धात कार पुलावरून रेल्वे ट्रॅकवर कोसळली. त्याचवेळी पनवेल कर्जत रेल्वे मार्गावरून मालगाडी जात होती. या मालगाडीने कारला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता, की यामध्ये कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला. याशिवाय दोघेजण गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बचावकार्य करत कारमधील जखमींना तातडीने उपचारासाठी MGM रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम