राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना यलोसह ऑरेंज अलर्ट !
दै. बातमीदार । २५ जुलै २०२३ । देशातील अनेक राज्यात पावसाचा कहर सुरु असून यात राज्यात देखील अनेक भागात जोरदार पाऊस कोसळत असून सोमवारी पावसाने विश्रांती घेतली असली तरी २८ जुलैपर्यंत यलो आणि ऑरेंज अलर्ट कायम आहे. पूरग्रस्त भागात अजूनही जनजीवन प्रभावित आहे.
सोमवारी सकाळी यवतमाळ, वाशिम, गडचिरोली जिल्ह्यात काही भागात पाऊस झाला. तर, रविवारी रात्री यवतमाळमधील दिग्रस, महागाव, वाशिम शहर, अमरावतीमधील चिखलदरा, गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा, चंद्रपूरच्या जिवती, गोंदिया, वर्धा, अमरावती येथे पाऊस झाला. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातही पावसाची विश्रांती होती. गडचिरोली, यवतमाळ, चंद्रपूर जिल्ह्याला २६ जुलैला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर २७ तारखेला भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट आहे. नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, वाशिम व बुलढाण्यात २८ जुलैपर्यंत यलो अलर्ट आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम