‘या’ कामात अव्वल आहेत पाकिस्तानी महिला !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २४ जुलै २०२३ ।  जगभरातील अनेक देशात महिलांचे कमी अधिक प्रमाण आहे. तर पाकिस्तान हे इस्लामी राष्ट्र असले तरी आणि या देशांमध्ये महिलांवर अनेक बंधने असली तरीही नुकत्याच जाहीर झालेल्या एका अहवालाप्रमाणे तब्बल 72 टक्के महिला धूम्रपान करत असल्याचे समोर आले आहे. पाकिस्तान तंबाखू बोर्डाने 2022 या वर्षाचा आपला वार्षिक अहवाल जाहीर केला असून त्यामध्ये ही माहिती देण्यात आली आहे.

पाकिस्तानमध्ये अशाप्रकारे महिलांमधील धुम्रपणाचे प्रमाण अचानक वाढल्यामुळे वैद्यकीय तज्ञांनीही चिंता व्यक्त केली आहे कारण धूम्रपानापाठोपाठ येणाऱ्या अनेक व्याधी सुद्धा या महिलांना जडण्याची भीती आता व्यक्त करण्यात येत आहे. पाकिस्तान मध्ये महिलांमधील धुम्रपानाचे प्रमाण कधीच इतके जास्त नव्हते पण गेल्या काही वर्षांमध्ये त्यात प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. पाकिस्तानमधील अनेक महिलांना सध्या तणाव आणि नैराश्याचा आजार जडला आहे.

त्याचे प्रमुख कारण धूम्रपान हेच आहे असे या अहवालात म्हणण्यात आले आहे गरोदर महिला धूम्रपान करत असतील तर त्यांच्या मुलांवरही या धुम्रपानाचा विपरीत परिणाम होतोय होत आहे असेही या अहवालात म्हटले आहे. धूम्रपान करणाऱ्या महिलांनी जर बाळाला जन्म दिला तर त्या बाळामध्ये फुफुसाचे आजार होण्याचे प्रमाण 20 टक्क्यांनी वाढते असाही इशारा या अहवालात देण्यात आला आहे. अहवालातील माहितीप्रमाणे पाकिस्तानमधील तीन कोटी नागरिक धुम्रपान करत असून वर्षाला 80 अब्ज पेक्षा जास्त सिगरेटी ओढल्या जातात. पाकिस्तान मध्ये दरवर्षी एक लाख 60 हजार पेक्षा जास्त नागरिक केवळ धुम्रपानामुळे निर्माण झालेल्या आजारामुळे मृत्युमुखी पडतात सध्या सिगरेटच्या एखाद्या डब्याची किंवा पाकिटाची जी किंमत आहे त्यापैकी 85% पैसे हे फक्त कर रूपाचे आहेत आता या उत्पादनावर अधिक कर वाढवणे आता शक्य नसल्याने पाकिस्तानमधील धुम्रपानाचे प्रमाण कसे कमी करायचे याबाबत आता चिंता व्यक्त होत आहे

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम