प्रसिद्ध गझल गायक पंकज उधास यांचे निधन

बातमी शेअर करा...

मुंबई:;- बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक पंकज उधास यांचं आज (26 फेब्रुवारी) प्रदीर्घ आजाराने निधन झालं आहे. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते. आज दुपारच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या ७२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पंकज उधास यांची मुलगी नायब उधास हिने आपल्या वडिल्यांच्या निधनाचं वृत्त सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केलं आहे.

पंकज उधास यांचा जन्म १७ मे १९५१ रोजी गुजरातमधील जेतपूर येथे झाला. तीन भावांमध्ये ते सर्वात लहान होते. त्यांचे कुटुंब राजकोटजवळील चरखाडी नावाच्या गावचे होते. त्यांचे आजोबा जमीनदार आणि भावनगर संस्थानाचे दिवाणही होते. त्यांचे वडील केशुभाई उधास हे सरकारी कर्मचारी होते तर, त्यांची आई जितुबेन उधास यांना गाण्याची खूप आवड होती. यामुळेच पंकज उधास आणि त्यांच्या दोन्ही भावांचा संगीताकडे नेहमीच कल होता.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम