मुंडेच्या मतदार संघात पंकजा अनुपस्थित ; चर्चेला उधान !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १५ जानेवारी २०२३ । राज्यातील भाजप या पक्षात अनेक नेते नाराज असल्याची चर्चा राज्यभर गेल्या काही दिवसापासून सुरु असतानाच ठाकरे गटाच्या नेत्याने पंकजा मुंडे यांना ऑफर दिल्याने राजकीय चर्चेला उधान आले होते. बीडमध्ये श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडावर संत वामन भाऊंचा पुण्यतिथी सोहळा सुरू आहे. या सोहळ्यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज गहिनीनाथ गडावर येणार आहेत. त्यांच्यासोबत पंकजा मुंडे सुद्धा याठिकाणी हजेरी लावणार होत्या.

मात्र त्यांचा दौरा रद्द झाला. त्यामुळे पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा आहे. यावर भाजपमधून मोठी प्रतिक्रिया आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पंकजा मुंडे यांच्या नाराजीबाबात प्रश्न विचारण्यात आला. यावर बावनकुळे म्हणाले, “पंकजा मुंडे माझ्याशी रोज बोलतात. मराठवाडा पदवीधर अर्जासंदर्भात त्यांच्याशी माझे बोलणं झालं. त्यांची प्रकृती परवा चांगली नव्हती. कधी-कधी वयैक्तिक अडचणी येतात. याचा अर्थ त्यांनी दांडी मारली असा होत नाही.”

“आम्ही ठरवलं आहे की एक नेता गेल्यानंतर दुसऱ्या नेत्याला त्याठीकाणी कशाला हजर असले पाहीजे. एखाद्या विधानसभेचे भुमीपूजन आहे, उद्घाटन आहे. तेव्हा ठीक आहे. मात्र एकाच कार्यक्रमात पाच-पाच नेते कशाला, त्यापेक्षा वेगवेगळे कार्यक्रम केले पाहिजे,” असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. पंकजा मुंडे यांना ठाकरे गटाची ऑफर आहे यावर बावनकुळे म्हणाले, “पंकजा मुंडे यांच्या रक्तात भाजप आहे. त्या कधीच जाऊ शकत नाहीत. ठाकरे गटाला त्यांचा पक्ष सांभळता येत नाहीत त्यामुळे ते अशा चर्चा करतात. त्यांचा पक्ष त्यांनी सांभाळला पाहीजे. पंकजा मुंडे यांच्या बद्दल त्यांनी अफवा पसरवू नये. पंकजा मुंडे यांना कोणीही फूस लावू शकत नाही ऐवढ्या त्या प्रगल्भ नेत्या आहेत. गोपीनाथ मुंडे यांचा आदर्श त्यांच्यावर आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम