आईच्या स्मृतिप्रित्यर्थ पारेख कुटुंबियांकळून माउली फाउंडेशनला 83 हजारांची देणगी.

बातमी शेअर करा...
  • प्रतिनिधी (भडगाव ):
    जन्मदिवस, स्मृतिदिन, विवाह वर्धापन दिन अशा विविध कारणांनी समाजात सत्कार्य करणाऱ्या, सेवाभावी संस्थांना मदत करणाऱ्या अनेक संवेदनशील व्यक्ती आपण आजूबाजूला पाहत असतो. अशा व्यक्तींपैकीच एक म्हणजे आनंद पारेख. अमरीकेतील सुप्रसिद्ध अशा भारतीय “क्वालिटी आइस्क्रीम” चे संचालक आनंद पारेख यांच्या आई आणि कांतिलाल पारेख यांच्या धर्मपत्नी _”ज्योतिका पारेख”_ यांचे 3 महिन्यापूर्वी दुःखद निधन झाले. आपली आई ही एक अत्यंत परोपकारी व्यक्ती होती व तिला इतरांना आपण कायम मदत करावी, असे वाटायचे. तेव्हा आईच्या स्मृतिप्रित्यर्थ आपणही काही तरी चांगले काम करावे, ह्या उद्देश्याने त्यांनी व त्यांचे वडील कांतीलाल जी पारेख यांनी माउली फाउंडेशन च्या विविध उपक्रमासाठी तब्बल 83,000 ₹ (त्र्याऐंशी हजार ) देणगी दिली.
    गेल्या 8 वर्षांपासून भडगाव आणि परिसरात माउली फाउंडेशनच्या माध्यमातून सुरु असलेल्या सामाजिक कार्याविषयी पारेख कुटुंबाला माहिती होती. आपल्या आईच्या स्मृतिनिमित्त माउली फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्या भारतातील महिला भगिनींसाठी -बांधवांसाठी काही चांगलं कार्य घडावे, या उदात्त हेतूने आनंदजी व कांतीलालजी यांनी फाउंडेशन ला नुकतीच देणगी दिली. त्याबद्दल माउली फाउंडेशनचे अध्यक्ष मनोहर सूर्यवंशी यांनी माउली फाउंडेशनच्या वतीने पारेख परिवाराचे आभार मानले आणि लवकरच दिवंगत ज्योतिका पारेख यांच्या स्मृतिप्रित्यर्थ एक विधायक उपक्रम फाउंडेशन च्या वतीने घेण्यात येईल, असेही सांगितले.
बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम