मराठा आरक्षण : मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा म्हणून भडगाव कडकडीत बंद

बातमी शेअर करा...

प्रतिनिधी | भडगाव :-

मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणास बसलेल्या श्री मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी आज भडगाव येथे कडकडीत बंद पाळण्यात आला.
दरम्यान पहाटे सकल मराठा समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात येऊन शासनाच्या विरोधात व मराठा आरक्षण मिळावे यासाठी घोषणा देण्यात आल्या. यावेळी डॉ विलास पाटील, विजय भोसले, जाकीर कुरेशी, विनोद अडकमोल , डॉक्टर निळकंठ पाटील, सोनवणे सर , हरिभाऊ पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले. मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे असा शासनाला संतप्त इशारा दिला . यानंतर घोषणा देत शहरात मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले . बाळद रोड , यशवंत नगर , पाचोरा रोड , रथ मार्गे नगरपरिषद व छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत ही मोटरसायकल रॅली काढण्यात आली. यात युवकांनी मोठा सहभाग नोंदविला.

मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी आमरण उपोषणास बसलेले श्री मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा म्हणून व शासनाचा निषेध म्हणून आज दि. 02/11/2023 वार गुरुवार रोजी बंदचे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे. यामध्ये अत्यावश्यक सुविधा तसेच शाळेच्या वाहनांना वगळता सर्वांनी या बंदमध्ये सामील व्हावे असे आवाहन करण्यात आले होते . त्याला प्रतिसाद देत भडगावकरांनी उत्स्फूर्तपणे सर्व आस्थापना बंद ठेवत मराठा आरक्षण बंद ला पाठिंबा दिला.
. हा बंद 100% सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कुठेही वादविवाद न होता शांततामय मार्गाने पाळण्यात आला.

भडगाव बंदला विविध सामाजिक संघटनांनी आपला पाठिंबा जाहीर केला आहे. यामध्ये मराठा क्रांती मोर्चा, मराठा युवा मोर्चा, मराठा महिला संघटना, युवक कौंग्रस , प्रहार जनशक्ती पक्ष, अखिल भारतीय बौद्ध संघटना, भारत मुक्ती मोर्चा, बहुजन मुक्ती पार्टी , एम आय एम पक्ष , मेडिकल आदी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदविला.
यावेळी डॉक्टर घनश्याम सूर्यवंशी, सौरभ पाटील, डॉ विलास पाटील, विजय भोसले, विनोद अडकमोल, काँग्रेसचे युवा नेते प्रदीप पाटील, आशुतोष पवार, भूषण पवार, चेतन पाटील, नंदकिशोर पाटील, सुधाकर पाटील, डी डी पाटील सर , जाकिर कुरेशी , भैय्यासाहेब पाटील , सरपंच दिलीप पाटील , डॉक्टर बी बी भोसले, विवेक पवार, मोसिन खाटीक, संदीप पाटील, योजना ताई पाटील, शशिकांत येवले , पाचोरा येथील
धनराज पाटील, संजय पाटील, डॉ. योगेश पाटील सर, नगराज पाटील (कुरंगी सरपंच), हरिभाऊ पाटील आदी पदाधिकारी सहभागी झाले होते . यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीने सहायक पोलीस निरीक्षक चंद्रसेन पालकर, पोलीस उपनिरीक्षक, पोलीस कर्मचारी यांनी बंदोबस्त ठेवला .

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम