शिक्षण मंत्रालयाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या ईनोव्हेशन कार्यशाळेत पलोड शाळेचा सहभाग

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार | ११ एप्रिल २०२४ | रसायनी येथील एचओसी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयामध्ये इनोव्हेशन, डिझाइन आणि उद्योजकता बुथकॅम्प कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

महात्मा एज्युकेशन सोसायटीच्या पिल्लई एचओसी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, रसायनी आणि एआयसीटीई, शिक्षण मंत्रालयाच्या इनोव्हेशन सेल (एमआयसी), सीबीएसई आणि एनसीईआरटी यांनी इनोव्हेशन, डिझाईन आणि उद्योजकता (आयडीई) बूट कॅम्प या कार्यशाळेचे दि. ४ एप्रिल व ५ एप्रिल रोजी आयोजन केले होते. या कार्यशाळेसाठी वाधवानी फाऊंडेशन व नोडेल सेंटर पिल्लई एच ओसी कॉलेज ऑफ इंजिनिअरीग अॅड टेक्नॉलॉजी प्रशिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. *यामध्ये विवेकानंद प्रतिष्ठान संचालित काशिनाथ पलोड पब्लिक स्कूलचे शिक्षक श्री अनिरुद्ध डावरे हे या कार्यशाळेमध्ये सहभागी झाले होते*. या कार्यशाळेत विद्यार्थी व शिक्षक यांच्यासाठी डिझाईन थिंकिंग, बिसनेस मॉडेलिंग आणि बाकल यांनी विद्यार्थी व शिक्षक यांचा उत्साह वाढविला.

प्राचार्य डॉ. जगदीश बाकल यांनी उपस्थितांना कार्यशाळेबद्दल मार्गदर्शन केले व विद्यार्थी व शिक्षक यांचा उत्साह वाढविला. तसेच डी. ललिता धारेखर, शासूज बीएआरसी यांनी मार्गदर्शन केले. डॉ. के एम. वासुदेवन पिल्लई, डॉ. प्रियम पिल्लई, डॉ. जगदीश बाकल, डॉ. निवेदिता श्रेयांश, डॉ. लता मेनन यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. य कार्यक्रमासाठी एआयसीटीईतर्फे हर्म राजपूत, प्रादेशिक प्रतिनिधी एआईसीटीई भारत सरकार आणि संदीप पाटील, आयटी प्रतिनिधी एआईसीटीई भारत सरकार उपस्थित होते. पिल्लई एचओसी कॉलेजमधून गजेंद्र पाटील यांनी विभाग विभागीय प्रतिनिधी, बूट कॅम्प म्हणून या कार्यशाळेचे काम पाहिले. ही कार्यशाळा एंटरप्राईज प्लॅनिंगवर गहन अनुभवात्मक प्रशिक्षण घेण्यासाठी आयोजित केली होती.

या कार्यशाळेसाठी भारतातून १३३ शिक्षक व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहूणे म्हणून ड के.एम. वासुदेवन पिल्लई संस्थाप महात्मा एज्युकेशन सोसायटी उपस्थित होते. या कार्यशाळेतील प्रशिक्षणाचा उपयोग प्रतिष्ठानच्या शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांना होईल. एंटरप्रेनर्स होण्यासाठी कशाप्रकारे आपण विचार करू शकतो तसेच एंटरप्रेनर्स होण्यासाठी असणारे कौशल्य व फायनान्शिअल सपोर्ट हा कसा आपल्याला प्राप्त होईल या संदर्भात विद्यार्थ्यांना व शिक्षकांना मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देता येईल. भविष्यात विद्यार्थ्यांच्या दृष्टीने या कार्यशाळेचे महत्त्व लक्षात घेऊन याचा फायदा विद्यार्थी व शिक्षकांना मिळावा यासाठी शाळेचे प्राचार्य श्री. प्रविण सोनावणे यांनी या कार्यशाळेचा लाभ घेण्याची संधी उपलब्ध करून दिली.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम