‘पठाण’ ने परदेशातही मोडले रेकॉर्ड ; केली इतकी कमाई !
दै. बातमीदार । ६ फेब्रुवारी २०२३ । देशात चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच त्यावर मोठे वादंग उठल्याने अभिनेता शाहरुख खान चांगलाच अडचणीत आला होता. पण चित्रपट भारतात प्रदर्शित झाल्यानंतर कोट्यांवधीची कमाई शाहरुखच्या ‘पठाण’ चित्रपटाने केली होती. विेदेशात देखील प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळाले. जगभरातून पठाण या चित्रपटाने आतापर्यंत तब्बल ८५० कोटींचे बाॅक्स आॅफिस कलेक्शन करत अनेक रेकाॅर्ड आपल्या नावावर केले आहेत. शाहरुख खान याच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट पठाणच ठरला आहे. शाहरुख खान याच्यासाठी २०२३ हे वर्ष यासाठी खास आहे की, पठाण चित्रपटाची धमाकेदार कामगिरी सुरू आहे. याच वर्षात शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान आणि मुलगी सुहाना खान हे देखील बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत.
पठाण चित्रपटाची घोषणा झाल्यापासून मोठा वाद निर्माण झाला होता. काहींनी तर थेट पठाण चित्रपटाचे नाव बदलण्याचीच मागणी केली होती. मात्र, यादरम्यान शाहरुख खान याने कोणत्याच गोष्टीवर भाष्य करणे टाळले होते. चित्रपटाला बजरंग दलासह अनेक संघटनांनी विरोध केला होता.
चित्रपटातील बेशर्म रंग हे गाणे रिलीज झाल्यानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चित्रपटाच्या विरोधात वातावरण बघायला मिळत होते. बेशर्म रंग गाण्यामध्ये दीपिका पादुकोण हिने भगव्या रंगाची बिकिनी घातल्याने या वादाला तोंड फुटले होते. पठाण चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर चित्रपटाला मोठ्या प्रमाणात विरोध केला जात होता. मात्र, प्रत्यक्षात चित्रपट रिलीज झाला आणि चित्रपटाची क्रेझ प्रेक्षकांमध्ये बघायला मिळाली. चित्रपटाने पहिल्याच दिवशी जबरदस्त असे बाॅक्स आॅफिस कलेक्शन करत सर्वांनाच मोठा धक्का दिला.
पठाण या चित्रपटाने ओपनिंग डेला भारतामधून तब्बल ५४ कोटींचे बाॅक्स आॅफिस कलेक्शन केले तर जगभरामधून तब्बल १०० कोटींचे कलेक्शन केले. तेंव्हापासूनच पठाण चित्रपटाने अनेक रेकाॅर्ड हे आपल्या नावावर करण्यास सुरूवात केलीये. अमेरिकेमध्येही शाहरुख खान याची जबरदस्त फॅन फाॅलोइंग आहे. USA मध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या बाॅलिवूड चित्रपटाच्या यादीमध्ये पठाणचा समावेश झाला असून पठाण हा चित्रपट तिसऱ्या क्रमांकावर आहे. बाहुबली २ या चित्रपटाने USA मध्ये १६९ कोटींचे कलेक्शन केले.
आरआरआर चित्रपटाने USA मध्ये १२२ कोटीचे बाॅक्स आॅफिस कलेक्शन केले. पठाण या चित्रपटाने USA मध्ये ११५ कोटींचे बाॅक्स आॅफिस कलेक्शन केले आहे. विशेष म्हणजे पुढील काही दिवसांमध्ये हा आकडा वाढण्याची दाट शक्यता आहे. कमाईच्या आकड्यांमध्ये आरआरआर चित्रपटाला देखील पठाण हा चित्रपट मागे टाकू शकतो.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम