रोटरी जळगाव मिडटाऊनच्या अध्यक्षपदी पाटील, सचिव कुळकर्णी

रविवारी पदग्रहण सोहळा

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ०९ जुलै २०२२ । जळगाव येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव मिडटाऊनच्या अध्यक्षपदी मनोज पाटील यांची तर मानद सचिवपदी आर.एन.कुळकर्णी यांची निवड झाली आहे.

मायादेवी नगरातील रोटरी भवनमध्ये रविवार दि.१० जुलै रोजी सायंकाळी ०६.३० वाजता होणाऱ्या सोहळ्यात नवनिर्वाचित पदाधिकारी पदभार स्विकारतील व नूतन कार्यकारिणीची घोषणा होणार आहे. याप्रसंगी रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० चे माजी प्रांतपाल राजीव शर्मा व सहप्रांतपाल डॉ. मुर्तुझा अमरेलीवाला यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याचे अध्यक्ष डॉ.विवेक वडजीकर व मानद सचिव तारीक शेख यांनी कळविले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम