भरवस येथिल कै श्रीराम गबाजी सोनवणे मा.विद्यालयात वृक्षारोपण व सतकार समारंभ उत्साहत

बातमी शेअर करा...

अमळनेर(प्रतिनिधि)तालुक्यातील भरवस येथील कै. श्रीराम गबाजी सोनवणे माध्यमिक विद्यालयात वृक्षारोपण व सत्कार समारंभ संपन्न झाला. कार्यक्रमाच्या TV tv अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक विजय सोनवणे होते.
शाळेच्या प्रांगणात माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष संजय पाटील ,तालुका गणित मंडळाचे अध्यक्ष डी. ए. धनगर,विजय सोनवणे यांच्या हस्ते वड ,पिंपळ ,करवंद आदी वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी संस्थेच्या वतीने संजय पाटील व डी ए धनगर यांनी व्ही स्कूल ऍप ऑनलाईन शिक्षणासाठी व्हीडिओ ,शैक्षणिक साहित्य तयार केले तसेच विविध संस्थांवर निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
संजय पाटील म्हणाले की विद्यार्थ्यांनी पावसाळ्यात वृक्षारोपण सारखी दररोज एक सत्कृत्य करावे , जगाशी स्पर्धा करण्याच्या अपेक्षेने मानसिकता खराब करण्यापेक्षा स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचा आगळा वेगळा ठसा उमटवला पाहिजे , तर डी. ए. धनगर यांनी गणित व संस्कार मूल्ये यांची सांगड घालून विद्यार्थ्यांनी आनंददायी अध्ययन कसे करावे याविषयी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक मुख्याध्यापक विजय सोनवणे यांनी सूत्रसंचालन आर. आर. सोनवणे यांनी तर आभार मंगला सोनवणे यांनी मानले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम