रोटरी वेस्ट, पाचोरा-भडगावतर्फे देशभक्तीपर नृत्य स्पर्धेचे आयोजन
30 स्पर्धकांचा सहभाग
दै. बातमीदार | 05 ऑगस्ट 2022 | जळगाव येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्ट आणि रोटरी क्लब ऑफ पाचोरा-भडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित देशभक्तीपर नृत्य स्पर्धेत 30 स्पर्धेकांनी सहभाग घेतला.
स्पर्धेचे उद्घाटन कथ्थक गुरु प्रा. डॉ. अपर्णा भट-कासार यांच्या तर परितोषिक वितरण रोटरीचे माजी सहप्रांतपाल डॉ. राजेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रोटरी वेस्टचे अध्यक्ष सुनील सुखवानी, रोटरी क्लब पाचोरा-भडगावचे अध्यक्ष डॉ.अमोल जाधव, सुयोग जैन, समीर जैन, कोरीयोग्राफर मयुर आहिरराव यांची प्रमुख उपस्थिती होती.
वय वर्षे 5 पासून 20 पर्यंतच्या स्पर्धकांनी नृत्याविकाराने उपस्थितांना मंत्रमुग्ध केल्यामुळे देशभक्तीपर वातावरण निर्माण झाले होते.
कार्यक्रमास रोटरी वेस्टचे मानद सचिव विवेक काबरा, पाचोरा-भडगाव क्लबचे मानद सचिव गोरखनाथ महाजन, योगेश भोळे, अनिल कांकरिया, चंद्रकांत सतरा, गौरव सफळे, मनोज केसवानी, सरिता खाचणे, मुनीरा तरवारी, किर्ती पाटील आदि मान्यवरांसह स्पर्धक व त्यांच्या कुटुंबियांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम