पवारांनी आखला प्लान ; भाजपसह अजित पवारांना बसणार धक्का !
दै. बातमीदार । २८ जुलै २०२३ । राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पक्षात बंडखोरी केल्यानंतर शरद पवार आता राज्यात पक्ष बांधणीसाठी मैदानात उतरले असून त्यांनी आता पक्षाचे बंडखोर नेते व भाजपला मैदानात चीतपट करण्यासाठी तयारी सुरु केली असून मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी याबबत ३ प्लॅन तयार केले असून, त्याचा सर्वात मोठा फटका केंद्रातील सत्ताधारी भाजपला बसण्याची शक्यता आहे.
शिंदे – फडणवीस सरकारमध्ये अजित पवार स्वतः उपमुख्यमंत्री झाले, तर छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे आदी बडे नेते कॅबिनेट मंत्री झाले. या घटनाक्रमामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची दोन शकले झाली. त्यानंतर अजित पवारांच्या गटाने शरद पवारांना सोबत घेण्याचा प्रयत्न केला. पण पवारांनी त्यांच्यासोबत येण्यास ठाम नकार दिला. आता पवार पुन्हा एकदा नव्या जोमाने पक्ष संघटना बांधणीसाठी मैदानात उतरलेत. त्यांनी यासंबंधी 3 प्लॅन तयार केलेत.
राष्ट्रवादी काँग्रेसची दोन शकले झाल्यानंतर शरद पवार यांनी पक्षाला उभे करण्यासाठी 3 प्लॅन तयार केलेत. यातील पहिल्या प्लॅननुसार, शरद पवार पक्ष बांधणीवर जोर देणार आहेत. त्यानुसार राज्यातील सर्वच महत्त्वाचे जिल्हे व तालुक्यांत त्यांच्या सभा होतील. या भागातील जनतेशी शरद पवार संवाद साधून त्यांना आपल्या गाठीशी बांधण्याचा प्रयत्न करतील. राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या भागावर त्याचा विशेष लक्ष असेल. नेते गेले तरी कार्यकर्ते व जनता आपल्याबरोर राहील याची खास काळजी शरद पवार घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
शरद पवार आपल्या दुसऱ्या प्लॅन अंतर्गत पर्यायी नेतृत्व निर्माण करण्यावर भर देणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्या आमदारांनी पक्षाशी बंडखोरी केली, त्यांच्या मतदार संघात ते पर्यायी नेतृत्व उभे करतील. यात पक्षाच्या माजी आमदारांना पुन्हा ताकद दिली जाईल. त्यांना रसद पुरवली जाईल. हे माजी आमदार निवडणुकीत उतरतील, याच हिशेबाने त्यांना तयार केले जाईल, असे सूत्रांनी सांगितले आहे.
शरद पवारांची तिसरी खेळी सत्ताधारी भाजपसाठी नुकसानकारक ठरण्याची शक्यता या आहे. या तिसऱ्या प्लॅननुसार, शरद पवार भाजपच्या अडगळीत पडलेल्या माजी आमदारांना आपल्या गोटात वळवण्याचा प्रयत्न करतील. या आमदारांना राष्ट्रवादीत घेऊन त्यांना रसद पुरवली जाईल. सूत्रांच्या माहितीनुसार, या आमदारांची राजकारणात पुन्हा सक्रीय होण्याची इच्छा आहे. पण भाजपने त्यांच्याकडे साफ दुर्लक्ष केले आहे. यामुळे त्यांचा नाईलाज झाला आहे. त्यामुळे पवारांचा त्यांच्यावर डोळा आहे. यात त्यांना यश आले तर ते भाजपसाठी चांगलेच जड जाईल.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम