देशातील अनेक राज्यात पावसाचा हाहाकार कायम !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २८ जुलै २०२३ ।  देशातील बदलत्या हवामानामुळे अनेक राज्यात पावसाचा हाहाकार सुरु असून गुरुवारीही तेलंगणात मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे अनेक सखल भागात पूर आला. तेथे गेल्या आठवडाभरात पावसामुळे आठ जणांचा मृत्यू झाला आहे. आज राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद राहणार आहेत. दुसरीकडे, महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, कोल्हापूर, नागपूरसह अनेक शहरांमध्ये गुरुवारी मुसळधार पावसाने रस्ते जलमय झाले.

राज्यातील नांदेडमध्ये अनेक भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. 50 हून अधिक कुटुंबांना स्थलांतरित व्हावे लागले, तर 2 जणांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रात एनडीआरएफच्या १३ तुकड्या स्टँडबायवर ठेवण्यात आल्या आहेत. दिल्लीतील यमुनेची पाण्याची पातळी अजूनही धोक्याच्या चिन्हापेक्षा 205.83 मीटर वर आहे. दिल्लीत पुढील ५ दिवस पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे हिमाचल प्रदेश, दिल्ली, उत्तराखंड ते महाराष्ट्र, तेलंगणा या भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचबरोबर देशातील ३२ टक्के जिल्ह्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती आहे. हवामान विभागाच्या ताज्या आकडेवारीनुसार मणिपूर, झारखंड आणि बिहार या जिल्ह्यांमध्ये 1 जून ते 27 जुलै दरम्यान सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. 20 ते 27 जुलै दरम्यान बिहारमधील 20 जिल्हे आणि झारखंडच्या 24 जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या निम्मा पाऊस झाला. उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूच्या बहुतांश जिल्ह्यांमध्येही सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम